दुसाने ज्वेलर्सवर ३८ लाखांहून अधिक रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

लाल दिवा-नाशिक,दि.२५:-अंबड (प्रतिनिधी) – सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायाच्या आडून ग्राहकांचा विश्वासघात करून कोट्यवधींची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अंबडमध्ये उघडकीस आली आहे. येथील दत्तनगर येथील दुसाने ज्वेलर्समधील मालक स्वप्निल रामदास दुसाने व त्याची पत्नी दिपाली दुसाने यांनी ग्राहकांना बनावट दागिने देऊन, तारण ठेवलेले सोने परत न करता तसेच खोटे चेक देऊन तब्बल 38 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विशाल उपगुप्त साळवे (वय ३४, रा. रो हाउस नं. ०३, श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, प्रशांत नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जानेवारी २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत स्वप्निल दुसाने व दिपाली दुसाने यांनी त्यांच्याकडून पॉलिश करण्यासाठी घेतलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने परत न करता तसेच रोख रकमेसह २,५५,०००/- रुपये घेऊन फसवणूक केली. त्यांनी साळवे यांना ३४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने देण्याचे आश्वासन देऊन खोटे चेक दिले. दुसाने दाम्पत्याने परिसरातील अन्य नागरिकांनाही अशाच प्रकारे गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्यांनी लोकांकडून तारण ठेवलेले ४९२ ग्रॅम ४६० मिलीग्रॅम वजनाचे सोने परत केले नाही. काहींना बनावट सोने देऊन फसवण्यात आले. अशा प्रकारे दुसाने दाम्पत्याने एकूण ३८,५६,२२०/- रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप दुसाने दाम्पत्याला अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे..

What’s your Reaction?
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
3
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!