डॅशिंग पोलिस हवालदार…… गुलाब सोनार यांना पोलीस आयुक्तांकडून प्रशस्ती पत्र……. पोलीस दल व नागरिकांकडून अभिनंदनचा वर्षाव….!
लाल दिवा : नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हे शाखा युनिट-२, चे पोलीस हवालदार गुलाब सोनार यांनी नाशिक शहरात मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणुन अथक परिश्रम घेवून एकुण २२,०५,०००/- रूपये किंमतीच्या २७ मोटार सायकल हस्तगत करून मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आपल्या या प्रशासनीय कामगिरी द्वारे आपण महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत निश्चित भर टाकली आहे. आम्ही आपल्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल आपले अभिनंदन करीत आहोत. आपण भावी काळात देखील असेच उत्कृष्ठ कर्तव्य बजावीत राहाल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत निश्चित भर टाकाल अशी मला खात्री आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1