झोन टू च्या डॅशिंग लेडी..पोलीस उपायुक्त मोनिका राऊत ॲक्शन मोडवर……. नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारास एक वर्षा करिता एमपीडीए ॲक्ट अन्वये केले स्थानबध्द…..!
लाल दिवा…..नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, मोनिका राऊत सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी, यांनी नाशिक. यांनी पोलीस ठाणे
हद्दीतीत सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायदया अन्वये प्रतिबंधक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. वरिष्ठांचे आदेशान्वये नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सराईत गुन्हेगार विशाल विनय चाफळकर वय २४ वर्षे रा. पेंढारकर कॉलनी, साने गुरूजी नगर, महाजन हॉस्पीटलच्या मागे, जेलरोड, नाशिकरोड याचे विरूद्ध शरिरीराविरुद्ध तसेच खंडणीचे गुन्हे नाशिक शहरात पोलीस ठाण्यामध्ये दाखल असल्याने त्याचा स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मंजुर केलेलाआहे.(दि,१३) ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त यांनी मंजुर केलेल्या स्थानबध्द आदेशाची अंमलबजावणी करणेकामी नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वपोनि अशोक गिरी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानबध्द सराईत गुन्हेगार विशाल विजय चाफळकर याचा त्याचे राहते घरी व नाशिक शहरात गुन्हे पथकाने शोध घेतला असता तो मिळुन येत नव्हता. तरी आज (दि. २३) ऑगस्ट २४ रोजी नाशिकरोड पोलीस स्टेशनचे सपोनि प्रविण सुर्यवंशी व त्यांचे गुन्हेशोध पथकातील अंमलदार हे स्थानबध्द इसम विशाल चाफळकर याचा जेल रोड परीसरात शोध घेत असतांना सपोनि प्रविण सुर्यवंशी यांना मिळालेल्या गुप्तबातमीदारामार्फत स्थानबध्द सराईत गुन्हेगार विशाल चाफळकर हा जेलरोड परीसरात आला असल्याबाबत खात्रीशिर माहीती मिळाल्याने त्यास पवारवाडी, जेलरोड परीसरात मोठ्या शिताफिने सपोनि प्रविण सुर्यवंशी व त्यांचे पथकाने विशाल चाफळकर यास ताब्यात घेतले. त्याचेवर पुढील स्थानबध्दतेची कारवाई वपोनि/अशोक गिरी नाशिकरोड पोलीस ठाणे
यांनी केलेली आहे. सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, मोनिका राऊत मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी, नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाहब नाईकवडे (गुन्हे), गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, सपोउपनि अनिल शिंदे, पोहवा विनय टॅमगर, विष्णु गोसावी, अविनाश देवरे, संदिप पवार, नाना पानसरे, दत्तात्रय वाजे, सागर आडणे, अजय देशमुख, केतन कोकाटे, कल्पेश जाधव,गोकुळ कासार, भाउसाहेब नागरे, रोहित शिंदे, योगेश रानडे यांनी केली आहे.