कैलास दवंगेच्या पाठपुराव्याने खंडणीखोर उपोषण कर्त्यावर गुन्हे दाखल…!
लाल दिवा-नाशिक, ता. ४ : गेल्या काही वर्षापासून नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे जिल्हा व मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांना वेळोवेळी त्यांच्याच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी व उपोषणकर्त्यामार्फत ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न करण्यात आला. विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. प्रसार माध्यमांना खोटी नाटी माहिती देऊन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. परंतु श्री. दवंगे यांनी वेळोवेळी पोलिसांना व प्रसार माध्यमांना कागदोपत्री मदत केली. त्यांना योग्य ती माहिती पुरवली. अशा प्रकरणात माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. अशा प्रकारची भूमिका मांडली. अशी बदनामी करण्याचे कारण म्हणजे त्यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर थेट पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. तर खोट्या नाट्या पद्धतीने उपोषण करत ब्लॅकमेल करणाऱ्या काहीं उपोषणकर्त्याना देखील थारा दिला नाही. त्यामुळेच त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आजही बदनामी करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
नाशिक मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी मागील तीन वर्षात भ्रष्ट व गुन्हेगार कर्मचारी व भूखंड माफियांवर धडक कार्यवाही करत कलम ८२ अन्वये गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगाची हवा खायला लावली होती. यात विशेषता मालेगाव, चांदवड, येवला, देवळा व नाशिक मधील काही धनदांडग्याचा देखील समावेश होता. वेळोवेळी कार्यवाही करतांना तथा कथित काहीं स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते, समाज विघातक प्रवृत्ती व कर्मचारी यांनी माध्यम प्रतिनिधी यांची दिशाभूल करून मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यावर दबाव मागील वर्षे भर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यातूनच श्री. दवंगे हे कोणत्याही दबाव तंत्राला बळी न पडता त्यांनी नोंदणी विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाहीचा धडाका चालू ठेवल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांमध्ये एक असंतुष्ट गट निर्माण झाला. नैराशापोटी त्यांनी अशा काहीं खंडणीखोर लोकांना आर्थिक प्रलोभन देऊन व गैरसमज परवण्यास सुरुवात केली. भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून श्री. दवंगे यांची शिस्तप्रिय प्रशासकीय कारकिर्दीला डाग लावण्याचा सपाटा सुरु केला. संदीग्ध व द्विअर्थी शब्द प्रयोग करून वर्तमान पत्र व समाज माध्यमातून बातम्या पेरण्यास सुरुवात केली. त्यानंतर वैयक्तिक पातळीवर कुटुंबातील व नात्यातील व्यक्ती यांचे नावे सुद्धा लिहिण्या पर्यंत मजल गाठली. प्रशासनातील उच्च पदाचा एकेरी उल्लेख करून वेळोवेळी महाभ्रष्ट व लाचखोर असा राजरोस उल्लेख करुन बातम्या समाज माध्यम व्हाट्स अप वरून रात्री बेरात्री पोस्ट करण्याचा सपाटा लावला. जेणेकरून सामाजिक बदनामी नको असा विचार करुन श्री. दवंगे हे खंडणी द्यायला तयार होतील. या भ्रमात हे टोळके राहिले. परंतु जानसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे व प्रशासकीय शिस्तीचा दरारा कायम ठेवण्याचा ध्यास घेतलेला असल्याने अशा खोट्या व खंडणीखोर खोटे उपोषण करण्याची पोस्ट पसरविणाऱ्याना श्री. दवंगे यांनी दाद दिली नाही. कारण त्यांना जनमानसावर दृढ विश्वास होता.
त्यामुळे खंडणी मिळत नाही. असं लक्षात आल्याने खंडणीखोर यांनी आपला मोर्चा पूर्वीचे दिंडोरी येथील दुय्यम निबंधक जयंत जोपूळे यांचेकडे वळवीला. श्री. जोपूळे सध्या कळवा जिल्हा ठाणे येथे कार्यरत आहेत. त्यांना काही लाख रुपये खंडणी मागण्यात आली. परंतु श्री. जोपूळे हे देखील शिस्तप्रिय अधिकारी असल्याने त्यांनी श्री. दवंगे यांना हा विषय सांगीतला. या लोकांना धडा शिकवायचा निर्धार केला आहे.
खंडणी व फुकटची चटक लागलेल्या व प्रशासनातील अनेकांना गंडा घातलेल्या या टोळीने ठाणे गाठत थेट कार्यालयात जाऊन पैसे मागायला सुरुवात केली. आता सावज टप्प्यात येत असल्याचे लक्षात आल्यावर श्री. जोपूळे यांनी घाबरल्याचे मुद्दाम दाखवायला सुरुवात केली. काही करुन आमची बदनामी थांबवा असे सांगितले. मदत करा अशी विनंती केली. लाखो रुपये देण्याचा प्रस्ताव त्यांना देण्यात आला. एवढे पैसे नसल्याने त्यांनी खंडणी विरुद्ध पथकाचें वरिष्ठ अधिकारी यांना संपर्क केला. जेव्हा सापळा रचला त्यावेळी एक जण श्री. दवंगे यांना संपवण्याची वल्गना करत असतांना खंडणी विरोधी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. मात्र तेथून तो पळाला. थेट रेल्वे स्टेशन गाठलं. त्यावेळी श्री. जोपूळे यांनी त्याला सांगितले की, मला नाशिक ला यायचं आहे. क्रुपया मला भेटा. तुमचे पैसे सोबत आणले आहे. सदर व्यक्ती हुशार असल्याने त्याने वेळोवेळी जागा बदलत एका ऑटो रिक्षा मध्ये पैसे स्वीकरत पळून जात असतांना पथकाने चपळायीने त्याच्या फिल्मी स्टाईल मुसक्या आवळल्या. कळवा पोलीस स्टेशनला क्र.५९७/२०२३ नुसार खोटे उपोषण करून जन मानसात अधिकारी याची बदनामी करणेची सुपारी घेणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सुभाष पाटील, समसाद पठाण व संतोष हिरे यांना अटक करुन जेलची हवा खायला लावली. सध्या श्री. दवंगे व श्री. जोपूळे यांचे या धाडसी कृती बाबत सर्वत्र हार्दिक अभिनंदन केले जात आहे.
सदर पथकाला वरिष्ठ पोलीस अधिकारी शेखर बागडे यांनी केलेल्या मार्गदर्शनमूळे ही कामगिरी फत्ते झाली आहे. त्याबद्दल त्यांनी बागडे यांना विशेष धन्यवाद देऊन अभिनंदन केले आहे. दरम्यान याबद्दल श्री. दवंगे यांनी सर्वांचे विशेष आभार मानले आहे.
- फोटो ओळी
ठाणे : हस्तगत केलेला माल दाखवताना पोलीस अधिकारी