धुळे येथुन नाशिक येथे १० महिन्याच्या मुलीच्या कॅन्सर उपचारासाठी आलेल्या इसमाचे पैसे रिक्षात विसरल्याने गुंडा विरोधी पथकाने २ तासात रिक्षाचा शोध घेवुन केले परत
लाल दिवा-नाशिक ,दि .१६/०१/२०२५ रोजी इसम नामे श्री. नितीन सुरेश जाधव रा. खर्दे ता. शिरपुर जि. धुळे हे त्यांच्या १० महिन्याच्या मुलीला कॅन्सर असल्याने धुळे येथुन नाशिक येथे नामको हॉस्पीटल आर.टी.ओ. ऑफिसजवळ येथे उपचारासाठी आले होते तेथुन पुढील चेकअप साठी स्कीन केअर सेंटर, राजीव गांधी भवन नाशिक येथे जायचे असल्याने त्यांनी आर.टी.ओ. ऑफिस येथुन रिक्षातुन स्कीन केअर सेंटर, राजीव गांधी भवन येथे आले. परंतु घाईगडबडीत ते त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरुन स्कीन केअर सेंटर मध्ये निघुन गेले असता त्यांचे लक्षात आले की बॅग ही रिक्षात राहिली आहे परंतु सदरची रिक्षा तेथुन निघुन गेली होती. सदर रिक्षावर पुढील काचेवर “जय मल्हार” असे लिहीलेले एवढेच त्यांना आठवत होते बाकी रिक्षाचा नंबर त्यांनी बघीतला नव्हता. सदर बॅग मध्ये मुलीच्या उपचाराची फाईल, ओरीजीनल कागदपत्रे व मुलीच्या उपचारासाठी मित्रांकडुन थोडे थोडे जमा केलेले पैसे ३२,७००/- रुपये होते. श्री. नितीन सुरेश जाधव यांनी तात्काळ मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक साो. यांना झालेली घटना कळविली.
सदर घटनेवरुन मा. श्री. संदीप कर्णीक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेला नमुद रिक्षा शोधुन त्या रिक्षामधील बॅग पिडीत व्यक्तीला मिळवुन देण्यासाठी आदेशीत केले. त्यानुसार मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुंडा विरोधी पथक यांना सुचना देवुन आदेश दिले होते.
त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी पोलीस अंमलदार यांना रिक्षाच्या पुढे काचेवर “जय मल्हार” नाव असलेल्या रिक्षांचा शोध घेणेबाबत आदेशीत केले. त्यावरुन पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की, रिक्षाच्या पुढे काचेवर “जय मल्हार” नाव असलेली रिक्षा ही म्हसरुळ- आर.टी.ओ. ऑफिस या रस्त्यावर चालते. त्यावरुन गुंडा विरोधी पथकाचे मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, राजेश राठोड असे आर.टी.ओ. ऑफिस परिसरात रवाना झाले व सदर परिसरात वर्णनाप्रमाणेची रिक्षेचा शोध घेतला असता एम.एच.१५ एफ.यु. १७२९ या रिक्षाच्या काचेवर “जय मल्हार” असे लिहीलेले दिसल्याने सदरची रिक्षा म्हसरुळ गावाकडे जाणा-या रस्त्यावर मिळून आली. सदर रिक्षा तपासली असता त्यात तक्रारदार यांची बॅग मिळुन आली त्यात असलेले ३२,७००/- रुपये, हॉस्पीटलच्या फाईल व इतर कागदपत्रे मिळुन आल्याने तक्रारदार यांचेशी संपर्क करुन त्यांना गुंडा विरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावुन नमुद वस्तु त्यांचे ताब्यात देण्यात आले. श्री. नितीन सुरेश जाधव यांनी व त्यांच्या परिवाराने नाशिक पोलीस आयुक्त व पोलीसांचे आभार मानले.
सदरची कामगिरी मा. श्री. संदीप कर्णीक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोउनि/मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.