नाशिक पोलीस दलाला अभिमान वाटावा अशांना मिळाले राष्ट्रपती पदक……जाणून घ्या कुणाला मिळाले राष्ट्रपती पदक…….!
लाल दिवा-नाशिक,ता.२५ :- नाशिक शहर पोलीस आयुक्तालातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सर्वोच्च सन्मानाचे राष्ट्रपती पदक प्रदान मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला १२ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देवुन केले सन्मानीत
पोलीस आयुक्तालय नाशिक शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपले सेवाकालावधीत विविध कामकाजाच्या ठिकाणी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाबदल सर्वोच्च सन्मानाचे राष्ट्रपती पदक घोषीत करण्यात आले आहे.
सर्वोच्च सन्मानाचे राष्ट्रपती पदक विजेते अधिकारी व अंमलदार
- नाशिक शहर, चुंचाले अंबड एमआयडीसी पोलीस चौकी , उत्तम सोनवणे ( माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक जाहीर 26 जानेवारी, 2024)
पोउनि. उत्तम राजाराम सोनवणे हे सन १९८८ मध्ये पोलीस दलात भरती झाले असुन पोलीस दलातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस मुख्यालय येथे त्यांची प्रथम नेमणुक करण्यात आली होती. त्यानंतर अंबड पोलीस ठाणे, भद्रकाली पोलीस ठाणे, स. वाडा पोलीस ठाणे, पंचवटी पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, गुन्हेशाखा, सी.आय.डी. व सध्या पोलीस उप निरीक्षक पदावर अंबड पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावित आहेत.
गुन्हेशाखा तसेच पोलीस ठाणे येथे कर्तव्यास असतांना त्यांनी मालाविरुध्द व शरिराविरुध्दचे अनेक क्लीष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना वेळोवेळी वरिष्ठांनी बक्षिसे व प्रमाणपत्रे देवुन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
अंबड पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असतांना कारागृहातुन संचीत रजेवर सुटलेला आरोपी नितीन पवार याने ब्युटीपार्लर मध्ये बळजबरीने शिरून तेथील महिलेला धारदार हत्याराने जिवे मारण्याची धमकी देवुन अतिप्रसंग केल्याने अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा पोउनि. उत्तम सोनवणे यांनी करून आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा मा. न्यायालयाने सुनावली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट तपासाबदल त्यांना सी.आय.डी. यांनी उत्कृष्ट तपासासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांना वेळोवेळी
पोलीस खात्यात ३५ वर्षे सेवा कालावधीत सुमारे २०० बक्षिसे ०७ प्रशंसापत्रे मिळाले असुन, सेवाकालावधीत केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजामुळे गुणवत्तापूर्ण व उल्लेखनिय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषीत झाले आहे.
- नाशिक शहर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदू रामभाऊ उगले नेमणूक बॉम्बशोधक व नाशक पथक ( माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक जाहीर 26 जानेवारी, 2024)
सपोउनि. नंदू रामभाऊ उगले हे सन १९९० मध्ये पोलीस दलात भरती झाले
असुन पोलीस दलातील प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे, पंचवटी पोलीस ठाणे, भद्रकाली पोलीस ठाणे, अंबड पोलीस ठाणे, शहर वाहतुक शाखा, आर्थिक गुन्हेशाखा व सध्या बॉम्ब शोधक व नाशक पथक, नाशिक शहर येथे सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणुन कर्तव्य बजावित आहेत.
पोलीस ठाणे येथे नेमणुकी असतांना अनेक प्रकारचे गुन्हयातील आरोपीतांना अटक करून गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांनी या केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांचा वेळोवेळी वरिष्ठांनी बक्षिस व प्रमाणपत्रे देवून गौरव केला आहे. पोलीस दलात त्यांनी कंमाडो, दहशतवाद विरोधी कोर्स, घातपात विरोधी तपासणी कोर्स, बॉम्ब डिस्पोजल कोर्स, व्ही.आय.पी. सिक्युरिटी कोर्स असे विविध खडतर कोर्स पुर्ण केले आहेत.
सपोउनि. नंदु उगले हे आतंरराष्ट्रीय उत्कृष्ट धावपट्टु असुन त्यांनी महाराष्ट्र, भारतातील इतर राज्य तसेच भारताबाहेरील ऑस्ट्रेलीया, श्रीलंका, सिंगापुर, मलेशिया, अमेरिका या देशामध्ये मॅरेथॉन, शॉट रन व लॉग रन स्पर्धेमध्ये सहभाग घेवुन गोल्ड, सिल्वर व ब्राँझ मेडल व प्रशस्तीपत्र मिळविले आहे. त्यांना नाशिक पोलीसांचा मिल्खासिंग म्हणुन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे नाशिक शहर व महाराष्ट्र पोलीस दलाचे नावलौकीक उंचावले आहे.
पोलीस खात्यात ३३ वर्षे सेवा कालावधीत सुमारे १८९ बक्षिसे ६ प्रशंसापत्रे मिळाले असुन, सन २०१९ मध्ये मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचे सन्मान चिन्हांने सन्मानित करण्यात आले आहे. सेवाकालावधीत केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजामुळे गुणवत्तापूर्ण व उल्लेखनिय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषीत झाले आहे.
- नाशिक शहर, पंचवटी पो.स्टे, स.पो.उप निरी अशोक लक्ष्मण काकड ( माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक जाहीर 26 जानेवारी, 2024)
सपोउनि. अशोक लक्ष्मण काकड हे सन १९८९ मध्ये पोलीस दलात भरती झाले असुन पोलीस दलातील प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे, शहर वाहतुक शाखा, भद्रकाली पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय व सध्या पंचवटी पोलीस ठाणे येथे सहा. पोलीस उप निरीक्षक म्हणुन कर्तव्य बजावित आहेत.
पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असतांना अनेक क्लीष्ट गुन्हे उघड करून गुन्हयातील आरोपीतांना अटक केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वरिष्ठांनी वेळोवेळी बक्षिसे व प्रशस्तीपत्रे देवुन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
पोलीस खात्यात ३६ वर्षे सेवा कालावधीत सुमारे २८१ बक्षिसे ९ प्रशंसापत्रे मिळाले असुन, सेवाकालावधीत केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजामुळे गुणवत्तापूर्ण व उल्लेखनिय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोशीत झाले आहे.
- नाशिक शहर, शहर वाहतूक विभाग, पो हवा/1235 नितीन विश्वनाथ संधान ( माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक जाहीर 26 जानेवारी, 2024)
पोहवा/१२३५ नितीन विश्वनाथ संधान हे सन १९९१ मध्ये पोलीस दलात भरती झाले असुन पोलीस दलातील १२ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस मुख्यालय येथे त्यांची प्रथम नेमणुक करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हेशाखा, अंबड पोलीस ठाणे, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जात पडताळणी विभाग व सध्या शहर वाहतुक विभाग, नाशिक शहर येथे पोलीस हवालदार म्हणुन कर्तव्य बजावित आहेत. गुन्हेशाखा येथे कर्तव्यास असतांना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले असुन टिप्पर गँगचा प्रमुख गण्या कावळ्या हा फरार असतांना त्याचा शोध घेवुन त्यास अटक करून मोठी कामगिरी केली आहे.
पोलीस खात्यात ३३ व सेवा कालावधीत सुमारे २२० बक्षिसे ५ प्रशंसापत्रे मिळाले
असुन, सन २०२२ मध्ये मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचे सन्मान चिन्हांने सन्मानित करण्यात आले आहे. सेवाकालावधीत केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजामुळे गुणवत्तापूर्ण व उल्लेखनिय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषीत झाले आहे.
मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी नाशिक शहर पोलीस दलातील चार पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण व उल्लेखनिय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषीत झाल्याने त्यांचा सत्कार केला. तसेच दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे मा. पालकमंत्री, नाशिक यांचे हस्ते राष्ट्रपती पदक विजेते यांचा सत्कार करण्यात येणार आहे.