मनपा अधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या इसमावर कारवाईची मागणी….!
लाल दिवा-नाशिक,ता.२४ : महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आपणांस नम्रतापूर्वक निवेदन देत आहोत की, नाशिक महानगरपालिकेत आमच्या विविध पदांवर नियुक्तया मा. शासनाकडील तसेच मा. आयुक्त साो. नाशिक मनपा यांच्या कडील कार्यालयीन आदेशानुसार झालेल्या आहेत. व त्यानुसार आपल्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसार आम्ही कार्यालयीन कामकाज करीत आसतो. सदरचे कामकाज करीत असतांना मा. आयुक्त साो. मा. शासनाचे नियम, महानगरपालिकेचे नियम याला अनुसरुन सर्वसामान्य जनतेच्या विविध तक्रारी नियमानुसार कर्तव्यभावनेने व प्रामाणिकपणे सोडविण्याकडे आमचे प्राधान्य असते.
परंतु नजकीच्या काळात असे निदर्शनास आलेले आहे की, शासकीय कामकाज करीत असतांना नियमानुसार कामकाज केल्यास काहींचे वैयक्तीक हितसंबंध व वैयक्तीक लाभ यांना बाधा येत असल्याने अश्या व्यक्ती, संस्था या दुखावल्या जावुन त्यांच्या पैकी काही वैयक्तीक व्देषापोटी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वैयक्तीक दोषारोप करुन त्यांच्याबद्दल तक्रारी करीत असतात तर काही जातीवाचक गुन्हे देखील दाखल करीत असतात. कालच आमच्या पैकी एक असलेले विभागीय अधिकारी श्री मयुर पाटील यांच्यावर अतिक्रमण कारवाई करणेसाठी गेल्यावर अश्याच प्रकारचा खोटा अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वास्ताविक सदर अतिक्रमणाची कारवाई ही सर्व प्रकारचा अहवाल विचारात घेवुन व पुरेश्या माहितीनुसार नियमानुसार व कायदेशीर प्रक्रीयेचे पालन करुन पूर्ण करण्यात आलेली होती.
सदरची बाब हि अतिशय गंभीर असुन नियमानुसार व पुरेश्या कर्तव्यनिष्ठतेने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकांऱ्यांच्या मानसिकतेवर आघात करणारी आहे. व सर्व प्रकारामुळे आमह अधिकान्यांचे मानसिक धैर्याचे खच्चीकरण होत असुन अश्या प्रकारच्या खोटया तक्रारीमुळे आम्हाला व आमच्या कुटुंबियांना मानसिक व सामाजिक जणावाला सामोरे जावे लागत आहे.
कृपया आपण आमच्या या परिस्थितीची व तणावाची योग्य ती दखल घेवुन भविष्यकाळात अश्या प्रकारांची पुर्नरावृत्ती होणार नाही यासाठी प्रशासनामार्फत कायमस्वरुपी उपाययोजना करुन आम्हाला शासकीय कामकाज करतांना योग्य ते संरक्षण मिळणेकामी उचित कार्यवाही करावी अशी आपणास विनंती करीत आहोत. प्रदीप चोचरी-अति. आयुक्त, श्रीकांत पवार-उपआयुकत,
नितिन नेर-उपआयुक्त, विजयकुमार मुंडे-उपआयुक्त प्रशांत पाटील-उपआयुक्त, डॉ. सुनिता कुमावत-विभागीय अधिकारी, राजाराम जाधव-विभागीय अधिकारी,.मयुर पाटील – विभागीय अधिकारी.योगेश रकटे-विभागीय अधिकारी,श्री.मदन हरीश्चंद्र-विभागीय अधिकारी,.डॉ.तानाजी चव्हाण- आरोग्य वैद्यकारी अधिकारी