गौरी सामाजिक कल्याणकारी संस्थेचा ‘विश्वगुरू भारत’ परिसंवाद संपन्न….!
लाल दिवा-नाशिक, ता.४ : भारताने कोविड काळात लसीकरणातून जगाचे लक्ष वेधले. नऊ वर्षांपूर्वी भारतात ऑनलाइन पेमेंटबाबत नकारात्मक चर्चा व्हायच्या. आज मात्र जगात सर्वात जास्त यूपीआय पेमेंट भारतात होत आहेत. “विश्वगुरू भारत’ अशी ओळख जागतिक पटलावर भारताची होत असल्याचा सूर ‘विश्वगुरू भारत’ परिसंवादात माध्यम क्षेत्रातील मान्यवरांच्या चर्चेतून निघाला.
गौरी सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या विद्यमाने कवी कालिदास कला मंदिरात गुरुवारी (दि. २) सायंकाळी सहा वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला. प्रमुख अतिथी उद्योगपती सुधीर मुतालिक, गौरी सामाजिक संस्थेच्या संस्थापिका रोहिणी वानखेडे- नायडू होत्या.ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, वृत्त निवेदिका अंजू पंकज (दिल्ली), पत्रकार सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी यांनी परिसंवादात भाग घेतला. प्रा. मनीषा शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले.
गौरी सामाजिक कल्याणकारी संस्था आयोजित विश्वगुरू भारत हा कार्यक्रम गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता कालिदास कला मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी भाऊ तोरसेकर, प्रातिपक्ष या यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा अंजू पंकज, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी प्रमुख अतिथी सुधीर मुतालिक व गौरी सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रोहिणी वानखेडे-नायडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्था परिचय डॉ. मनीषा शुक्ल, उपाध्यक्ष, गौरी सामाजिक कल्याणकारी संस्था यांनी केले. अतिथींचा परिचय माधवी रहाळकर व प्रा. मनीषा शुक्ल यांनी केला. पाहुण्यांचा सत्कार रोहिणी वानखेडे-नायडू, अनिरुद्ध कंटे, राजेंद्र वानखेडे व माधवी रहाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा चोपडे यांनी केले. विशेष स्तवन अमृता राहळकर व मोगल यांनी सादर केले. सुधीर मुतालिक यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वगुरू भारत हा विषय घेऊन परिसंवाद प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हा कार्यक्रम उलगडत गेला. आभार प्रदर्शन रोहिणी वानखेडे नायडू यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री कंठे, सौ.अपर्णा कंठे, सारंग नाईक, माधवी रहाळकर रत्ना नेरकर, राजश्री सुरावकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद धोपावकर, न्यू ग्रेस अकॅडमीचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
- फोटो ओळी
नाशिक : विश्वगुरू भारत कार्यक्रम प्रसंगी उपस्थित भाऊ तोरसेकर, अंजू पंकज, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, सुधीर मुतालिक, रोहिणी वानखेडे-नायडू, डॉ. मनीषा शुक्ल, माधवी रहाळकर, अनिरुद्ध कंटे, राजेंद्र वानखेडे, पुष्पा चोपडे, अमृता राहळकर, श्री कंठे, अपर्णा कंठे, सारंग नाईक, रत्ना नेरकर, राजश्री सुरावकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद धोपावकर आ