वजन कमी करण्याच्या आमिषाने साडेचार लाखाचा गंडा! बोगस डॉक्टरचा प्रताप, महिलांचा सावधान!

लाल दिवा-नाशिक,२७ :- शहरातील ठक्कर बाजार परिसरात एका बोगस डॉक्टरने वजन कमी करण्याचे आमिष दाखवून एका महिलेला जाळ्यात ओढले आणि तब्बल साडेचार लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादी महिलेने पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी निलेश अशोक पगार उर्फ निल पाटील हा स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून लोकांना गंडवत असे. त्याने फिर्यादी महिलेला तिचे वजन कमी करण्याचे आश्वासन देऊन तिच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी त्याने काही रक्कम परतही केली.

मात्र नंतर तो फिर्यादीला धमकावू लागला. तिच्याकडे असलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो सतत पैशांची मागणी करू लागला. अखेर त्रास असह्य झाल्याने फिर्यादीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी निलेश पगार उर्फ निल पाटील विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!