गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या …..! गंगापुर पोलीस ठाणे गुन्हेशोध पथक तसेच क्राईम युनिट 2 यांची संयुक्त उल्लेखनिय कामगिरी ….!
लाल दिवा -नाशिक,दि.११: मा.पोलीस आयुक्त सो, श्री अंकुश शिंदे सो, यांनी नाशिक शहरातील घरफोडी चोरी करणा-या इसमांचा शोध घेवुन घरफोडी चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे मा.पोलीस आयुक्त सो, श्री अंकुश शिंदे , मा.पोलीस उप- आयुक्त परिमंडळ -1 श्री किरणकुमार चव्हाण सो , मा. सहा. पोलीस आयुक्त सरकावाडा विभाग श्री सिध्देश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांबद्दल माहीती गोळा करणेबाबत गुन्हेशोध पथकातील अधिकारी व अमंलदार यांना सुचना दिल्या होत्या.
दिनांक 09/09/2023 रोजी फिर्यादी श्री. देवानंद समाधान गिरी वय -27 वर्ष , रा. शिवाजी नगर, नाशिक यांनी फिर्याद दिली की, दिनांक 06/09/2023 रोजीचे रात्री 22.30 ते दिनांक 07/09/2023 चे सकाळी 11.00 वा. चे दरम्यान बाहेर गावी गेलो असतांना कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे बंद घराचा दरवाज्याचे कुलुप ,कोंडा तोडुन आत प्रवेश करून बेडरूम मधील कपाटात ठेवलेले 15,000/- रू. किंमतीचे सोन्याचे पैंडल व लहान मुलीच्या कानातील रिंगा तसेच 10,000/- रू. किं.चा सँमसंग कंपनीचा 32 इंची रंगीत एल.ई.डी. टी.व्ही असा एैवज कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी नेले आहे बाबत खबर दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने गंगापुर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील पोना / 1078 रविंद्र मोहिते यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दिनांक 06/09/2023 रोजी रात्री शिवाजी नगर भागात झालेल्या घरफोडी चोरी करणारा पुन्हा शिवाजी नगर,सातपुर भागात चोरी करण्यासाठी येणार आहे बाबत माहिती मिळाली. सदर बातमीची माहीती पोना / मोहिते यांनी रात्रगस्त चेकिंग 2 अधिकारी श्री. श्रीकांत निंबाळकर सर तसेच क्राईम युनिट 2 चे पोहेकॉ/ 528 राजेंद्र घुमरे, पोहेकॉ/199 चंद्रकांत गवळी, पोहेकॉ/ 767 सोमनाथ शार्दुल अशांना व गंगापुर पोलीस ठाणेकडील रात्रगस्तीस असलेले पोना / 1046 गिरीष महाले, पोअं / सोनु खाडे, पोअं/ गोरख सांळुखे अशांना देण्यात आली. त्यानंतर मिळालेल्या बातमी प्रमाणे गंगापुर गुन्हेशोध पथकाचे वर नमुद अमंलदार व क्राईम युनिट 2 चे पोलीस अंमलदार अशांनी शिवाजीनगर, सातपुर ,कार्बन नाका भागात सापळा रचुन एक संशयित अट्टल घरफोड्या महेश बळीराम शिरसाठ रा. गोवर्धन, गंगापुरगांव नाशिक ह.मु पुणे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक सखोल व सर्वोतोपरी कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली. सदर आरोपीताकडुन गुन्हा घडलेपासुन 24 तासाचे आत गंगापुर पोलीस ठाणे कडील गु.र.नं 232/2023 भा.द. वि कलम 454,457,380 दाखल गुन्हयातील 10,000/- रूपये किंमतीचा चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा LED टिव्ही तसेच गु.र.नं 105/2023 भा.द.वि कलम – 454 ,457,380 दाखल गुन्हयात चोरीस गेलेला लिनोवा कंपनीचा 25,000/- रूपये किमंतीचा डेस्कटॉप, डेल कंपनीचा 50,000/- रूपये किंमतीचा लॅपटॉप असा घरफोडी चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपी कडुन हस्तगत करण्यात आला आहे. त्याचेकडे केलेल्या सखोल तपासात त्याने अजुन एक LG कंपनीचा 35,000/- रूपये किंमतीचा 52 इंची LED टिव्ही काढुन दिला आहे. असा आरोपीताकडुन एकुण 1,25,000/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी माननीय श्री.अंकुश शिंदे,पोलीस आयुक्त सो, नाशिक शहर तसेच मा.श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उप –आयुक्त सो, परिमंडळ -1 नाशिक शहर, मा.प्रशांत बच्छाव सो,गुन्हेशाखा नाशिक शहर, मा. सिध्देश्वर धुमाळ , सहा. पोलीस आयुक्त सो, सरकावाडा विभाग, मा. डॉ. सिताराम कोल्हे,सहा. पोलीस आयुक्त सो, गुन्हेशाखा,नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.श्रीकांत निबांळकर, गुन्हे शोध पथकाचे पोउनि मोतीलाल पाटील, पोना/ 1078 रविंद्र मोहिते, पोना/1846 गिरीश महाले, पोना / 1894 मिलिंद परदेशी, पोअं/ 1448 मच्छिंद्र वाकचौरे, पोअं/2300 गोरख सांळुखे ,पोअं /1438 सोनु खाडे, पोअं/ सुजित जाधव,चालक पोअं/860 थवील यांनी तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. रण्जित नलावडे सो, गुन्हेशाखा युनिट 2 व त्यांचेकडील नेमणुकीचे पोहेकॉ/ 528 राजेंद्र घुमरे, पोहेकॉ/199 चंद्रकांत गवळी, पोहेकॉ/ 767 सोमनाथ शार्दुल यांनी गंगापुर पोलीस ठाणे सोबत संयुक्तपणे केलेली आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोना/ 1078 रविंद्र मोहीते करीत आहे.