स्वप्नांचा चुराडा! ४९ लाखांच्या फसवणुकी प्रकरणी जावयांसह सासरे-सासूंवर गुन्हा दाखल !

स्वप्नांचा चुराडा! ४९ लाखांच्या फसवणुकी प्रकरणी जावयांसह सासरे-सासूंवर गुन्हा दाखल

लाल दिवा-नाशिक,दि.१४:-नाशिकरोड येथे नातीगोतीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या वयात विश्वासाचे बंध अधिक घट्ट व्हायला हवेत त्याच वयात एका क्रूर जावयाने आपल्याच सुनेला तब्बल ४९ लाखांच्या खाईत लोटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात सुनेच्याच विश्वासाचा फायदा घेत तिच्या स्वप्नांचा चुराडा करण्यात आला आहे. आरोपी जावयासोबत त्याचे आई-वडीलही या कटात सहभागी असल्याने या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मोनिका, जी स्वप्नांच्या दुनियेत राहून आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी धडपडत होती, तिला तिच्याच पती प्रशांत गारमोडे यांनी गोड भाषेत फसवले. जेलरोड भागातील मौजे दसक येथील एका भूखंडाची स्वप्ने दाखवत, विशेष मुखत्यारपत्राद्वारे ती जमीन विक्री करण्याचे आमिष दाखवत, मोनिका यांच्याकडून तब्बल ३० लाखांचे कर्ज काढण्यास भाग पाडले. 

हा पैसा थेट सासरे श्रीकृष्ण गारमोडे यांच्या खात्यात जमा करण्यात आला. पण ही तर सुरुवात होती. या विश्वासघाताची परिसीमा अशी की, मोनिका यांचे नाव जमिनीच्या कागदपत्रांवर कधीच चढवण्यात आले नाही. शिवाय, हे तिघेही म्हणजे पती प्रशांत, सासरे श्रीकृष्ण आणि सासू निर्मला यांनी मिळून ही जमीन दुसऱ्याच व्यक्तीला विकून टाकली. 

ही घटना उघडकीस आली तेव्हा मोनिका हादरली होती. एकीकडे डोन लाखांच्या कर्जाचे ओझे डोक्यावर तर दुसरीकडे विश्वासघाताची जळजळाट. मोनिका यांना आता २३ लाख ९० हजार ४६० रुपयांची कर्जाची वसुली नोटीस आल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. 

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पती प्रशांत गारमोडे, सासरे श्रीकृष्ण गारमोडे आणि सासू निर्मला गारमोडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ३४ आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंध कायदा कलम ३(१) (एफ), ३ (१) (झेड-सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!