खुनाच्या गुन्हयातील दोषसिध्द गुन्हेगार राकेश कोष्टी याचा जामिन ; मा. उच्च न्यायालयाने केला नामंजूर…!
लाल दिवा -नाशिक,७ : पंचवटी पोलीस स्टेशन हददीत सन २०१६ मध्ये मातोश्री मेडीकल समोर, हनुमानवाडी कॉर्नर, क्रांतीनगर, पंचवटी नाशिक येथे भेळविक्री करणारा इसम नामे सुनिल वाघ यांस सराईत गुन्हेगार यांनी कपाळावर, पायावर डोक्यावर अमानुषपणे मारहाण करून ठार केले होते. मयत यांचा भाऊ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पो.स्टे. येथे गुरनं. २९६ / २०१६ भादंविक ३०२, ३०७, ३२३, १४३, १२०(ब) वगैरे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- खुनाच्या गुन्हयाचा तपास करून गुन्हयात सहभाग असलेल्या आरोपीतांना अटक करून सराईत गुन्हेगारांविरुध्द मा. न्यायालयात दोषारोप पाठविण्यात आले होते. मा. न्यायालयात सदर गुन्हयाची सुनावणी होवुन खुनाच्या गुन्हयातील सराईत गुन्हेगार १) कुंदन सुरेश परदेशी वय २४ वर्षे २) अक्षय कैलास इंगळे वय २१, ३) रविंद्र दगडुसिंग परदेशी, ४) जयेश हिरामण दिवे वय २६, ५) राकेश तुकाराम कोष्टी वय-३०, ६) व्यंकटेश नानासाहेब मोरे वय २८, (७) किरण दिनेश नागरे वय-३५, ८) गणेश भास्कर कालेकर वय २५ वर्षे यांना न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप, सक्षम कारावास व दंडाची शिक्षा दिनांक ११/०७/२०२३ रोजी सुनावली असुन सर्व सराईत गुन्हेगारांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
- पंचवटी पो.स्टे. गुरनं. २९६ / २०१६ या गुन्हयातील आरोपी राकेश तुकाराम कोष्टी याने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे जामिनाकरिता अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या सुनावणी दरम्यान सरकारी अभियोक्ता यांनी गुन्हयाची गंभीरता व आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी तसेच सदर गुन्हयात देण्यात आलेल्या दोषसिध्दीबाबत यथायोग्य बाजु मांडल्याने सराईत गुन्हेगार राकेश तुकाराम कोष्टी याचा जामिन मा. उच्च न्यायालय, मुंबई येथुन नामंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे सदर आरोपीचा पुढील मुक्काम मध्यवर्ती कारागृहात कायम झाला आहे.
पंचवटीच्या गुन्हयातील शिक्षेमुळे गुन्हा करणा-यास अंतिमतः शिक्षा व त्यानंतर मध्यवर्ती कारागृहात जिवन कंठने हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे आपले जिवन आनंदी जगण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही याबाबत तरूणांनी लक्षात ठेवावे व त्यांनी गुन्हेगारीपासुन दुर रहावे असे अवाहन नाशिक शहर पोलीसांच्या वतीने करण्यात येत आहे..