गुन्हेशाखा युनिट क. १ चे अनिल शिंदे यांची दमदार कामगिरी………गोवंश मांस विक्री करणारा इसम जेरबंद…..!
लाल दिवा-नाशिक,ता.२५:- : (दी,२४ )रोजी युनिट क. १, नाशिक शहर कडील पोलीस अंमलदार मुक्तार शेख तसेच आप्पा पानवळ यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मोठा राजवाडा, भद्रकाली नाशिक येथे एक इसम गोवंश जनावराची कत्तल केलेले मांस त्याचे मारूती सुझुकी गाडीतुन विक्री करीता येणार आहे. त्यावर आज पहाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, समाधान पवार अशा पथकाने मोठा राजवाडा भद्रकाली नाशिक येथे सापळा लावुन मारूती सुझुकी ८०० गाडी कमांक एम. एच ०४-डी.बी-१९३२ या मारूती सुझुकी गाडी मधील इसम नामे शादाब बिसमिल्ला कुरेशी, वय-४७वर्षे, रा-घर नं ३७१५ कादरी मस्जिद, बागवानपुरा, वडाळानाका भद्रकाली नाशिक यास मोठा राजवाडा, भद्रकाली नाशिक येथुन ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे ताब्यातील मारूती सुझुकी गाडीमध्ये गोवंश जनावरांचे सुमारे २०० किलोच्या वर मांस मिळाले. तात्काळ पशु वैदयकीय अधिकारी वैशाली थोरात मॅडम यांना बोलावुन मांस चेक करून ताब्यात घेतले. त्यावर पंचनामा करून वाहनासह एकुण १, लाख १०,हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवुन सदर इसमांविरूध्द प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५, ५ अ, ९ व ११ सह भादवि कलम ४२९ प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाणेस फिर्याद देवून त्यांना मुद्देमालासह भद्रकाली पोलीस ठाणेचे ताब्यात पुढील कारवाईकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, विजय पगारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, समाधान पवार अशांनी केलेली आहे.