पोलीस अधिकारी मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली…. डॉक्टरांच्या हल्लेखोरास अवघ्या २४ तासात अटक. …… डॉक्टर मंडळींनी पोलिसांचे मानले आभार…..!
लाल दिवा-नाशिक,ता.२४ :- सुयोग हॉस्पिटल, नाशिक येथील मिटींग रूम मध्ये डॉ. कैलास जगदीश राठी, वय ४८ वर्षे यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने इसम नामे राजेंद्र चंद्रकांत मोरे याने आर्थिक देवाण-घेवाणच्या वादातुन कोयत्याने डोक्यावर, गळयावर वार करून गंभीर जखमी करून पळुन गेला होता. सदर संशयिता विरूध्द डॉ. रिना कैलास राठी यांचे तकारीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे। गुन्हा. रजि. नं. १०९/२०२४ भा.दं.वि. कलम ३०७,३४ सह आर्म अॅक्ट ४/२५, मुपोकाक. १३५ अन्वये नोंद करण्यात आला आहे.
सदर संवेदनशील गुन्हयाचे अनुषंगाने संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, मोनिका राऊत, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२, नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी सदर गुन्हयातील संशयित आरोपीताचा शोध घेवुन तात्काळ अटक करणेबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे जखमी डॉ. कैलास राठी यांची अपोलो हॉस्पिटल, नाशिक येथे भेट घेवुन, त्यांची पत्नी डॉ. राठी व वैद्यकिय अधिकारी, अपोली हॉस्पिटल, नाशिक यांचेशी प्रकृती बाबत विचारपुस केली.
त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयातील संशयित आरोपीतांचा शोध घेण्याकरीता पंचवटी पोलीस स्टेशन कडील पथके रवाना करण्यात आली होती. संशयित आरोपी राजेंद्र चंद्रकांत मोरे, वय ३७ वर्षे हा जुना आडगांव नाका, संतोष टि पॉईट परिसरात त्याचे भावास भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार शेखर फारताळे यांना प्राप्त झाल्याने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शना खाली सदर परिसरात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार शेखर फारताळे ,संतोष जाधव, राजेश सोळसे, पोलीस नाईक यतीन पवार, पोलीस अंमलदार श्रीकांत कर्पे, युवराज गायकवाड या पोलीस पथकाने सापळा रचुन संशयित आरोपीतास ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाणे येथे आणुन सदर गुन्हयात अटक केली आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी ही संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, नितीन जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक (गुन्हे). श्री. नंदन बगाडे, पंचवटी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, मिथुन परदेशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार शेखर फारताळे, सागर कुलकर्णी, संतोष जाधव, राजेश सोळसे, पोलीस नाईक यतीन पवार, पोलीस अंमलदार श्रीकांत कर्पे, पोलीस अंमलदार युवराज गायकवाड, व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अशांनी पार पाडली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि. विलास पडोळकर हे करत आहेत..