ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही, उद्धव ठाकरे गटाची सरकारवर टीका…!
लाल दिवा-नाशिक,ता.५ : जनतेच्या वतीने एकच मागणे आहे, एक फक्त एक निवडणूक बॅलट पेपरवर घ्यायची हिंमत दाखवा. लोकशाहीसाठी तेवढी एक ‘गॅरंटी’ द्याच! आता यावर काही टिल्ले-पिल्ले सांगतात, “मग ईव्हीएमने तेलंगणात कसा विजय मिळवला?” मोठा दरोडा लपविण्यासाठी थोडा माल मोकळा ठेवून दरोडेखोर पळाले. हीच एक मास्टर स्ट्रेटेजी आहे व हीच आधुनिक चाणक्यनीती आहे. पुढची लढाई ही फक्त विचारधारा, हुकूमशाहीविरुद्ध नसून लोकशाहीतील या दरोडेखोरीविरुद्ध आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘लोकशाही’ वाचविण्याची गॅरंटी द्यावी. ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
1
+1
+1
+1