गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांची दमदार कामगिरी……घरफोडीच्या आरोपींना अवघ्या २४ तासांत केली अटक…..!

लाल दिवा-नाशिक,ता .: दिनांक २२/०१/२०२४ रोजी रात्री २१:३० वा. ते दि. २३/०१/२४ रोजीचे सकाळी ०९:३० वाजेच्या दरम्यान सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुरूचार्य सुगंधालय अगरबत्ती, पेठेशाळेच्या मागे, नाशिक या ठिकाणी अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर उचकुन त्यांच्या दुकानातुन रोख रक्कम व मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला होता म्हणुन त्यावरून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने सरकारवाडा पोलीस स्टेशन कडील । गुरनं ३१/२०२४ भादविक ४५४,४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी मार्गदर्शन केले होते.

………………..

 

त्या अनुषंगाने सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क.१ चे पथक यांनी सुरू करून घटनास्थळा वरील तसेच आजु बाजूच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली तसेच दिनांक २५/०१/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस हवालदार रमेश कोळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सी.सी.टी.व्ही. फूटेज मधील चोरी करणारे दोन्ही इसम हे सिध्देश्वर मंदिराजवळ घारपुरे घाट येथे येणार असल्याचे माहिती मिळाली. सदरची बामती पोलीस हवालदार रमेश कोळी यांनी वपोनि श्री. विजय ढमाळ यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/चेतन श्रीवंत, सपोउनि/वसंत पांडव, पोहवा /६०५ रमेश कोळी, पोहवा/२३३ धनंजय शिंदे, पोअं/२२६० जगेश्वर बोरसे, पोअं/२२७३ अमोल कोष्टी, पोअं/१४०५ आप्पा पानवळ, पोअं/२४५० राजेश राठोड अशांनी सिध्देश्वर मंदिराजवळ घारपुरे घाट, नाशिक येथे सदर इसमाना शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यांस त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नावे १) विशाल संजय कंक, वय-२३ वर्षे, रा. खालचे चुंचाळे ता. जि. नाशिक २) दिपक शाम वाघारे, वय-२३वर्षे, रा. गंगापुर गाव, ता. जि. नाशिक असे सांगीतले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे वरील गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्यानंतर सदर आरोपीतांच्या अंगझडतीत फिर्यादी यांचे चोरी गेलेले १३,०००/-रूपये किंमतीची दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपीतांना मुदद्दे‌मालासह सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात पुढील कारवाई कामी देण्यात आले आहे.

 

सदर गुन्हयातील आरोपी पैकी विशाल संजय कंक, वय-२३ वर्षे याचेवर यापुर्वी सातपुर पोलीस ठाणे येथे गुरंन ६५/२० भादविक ३७९,३४ गुरनं. १८५/२० भादविक ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

 

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक सो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, पोउपनि चेतन श्रीवंत, सपोउनि वसंत पांडव, पोहवा /६०५ रमेश कोळी, पोहवा / २३३ धनंजय शिंदे, पोअं/२२६० जगेश्वर बोरसे, पोअं/२२७३ अमोल कोष्टी, पोअं/१४०५ आप्पा पानवळ, पोअं/२४५० राजेश राठोड अशांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!