पोलीस उपायुक्त मनिका राऊत यांचा ट्रिपल धमाका……..एमडी” विक्रेत्यास ठोकल्या बेडया २७.५ ग्रॅम एमडीसह एकुण ३ लाख ३४,००० रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत….. तर करून ५ जणांना अटक…..!

लाल दिवा-नाशिक,ता.२५ : एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत एक्सलो पॉईंटजवळ मुंब्रा ठाणे येथुन एक इसम मॅफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची स्थानिक इसमास विकी करण्याकरिता येणार असलेबाबत गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस शिपाई हाडे यांना विश्वासु खब-यामार्फत मिळाली.

सदर गोपनीय माहिती वरिष्ठांना देवुन त्यांचेकडुन सदर गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्याची परवानगी प्राप्त केली. मा. वरिष्ठांकडुन परवानगी प्राप्त होताच गोपनीय माहितीची शहानिशा करून त्यांचेवर कारवाई करणेकरिता प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सपोनि मुगले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदिप पवार, चापोशि सोनावणे, पोशि कु-हाडे, पोशि २ कांदळकर, पोशि बिराजदार, पोशि २ खैरणार, पोशि नेहे, पोशि जाधव, पोशि ढाकणे, पोना चव्हाण, मपोशि खर्डे, शासकीय फोटोग्राफर पोशि भालेराव यांना दोन पंचासह सुचना दिल्या. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सपोनि मुगले, पोउनि संदिप पवार व पथकाने साफळा लावला असता गोपनीय बातमी प्रमाणे संशयित इसम मुस्ताक शखे उर्फ भुन्या हा काही संशयीत इसमांचे सोबत बोलतांना व एक पाकीट घेउन त्यास पैसे देतांना दिसला म्हणुन तपास पथकाने त्यांचेवर छापा मारून कारवाई केली असता सदर इसम हे प्रतिबंधित आमली पदार्थ एम डी ची खरेदीविक्री करतांना मिळुन आले त्यावेळी त्याचेकडे २७.५ ग्रॅम वजनाची एम डी हे प्रतिबंधीत आमली पदार्थ व रोख रक्कम असे एकुन ३,३४,०००/- रू. कि.चा मुददेमाल मिळुन आला आहे. सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, नाशिक श्री. संदीप कर्णीक साो, मा.

पोलीस उप आयुक्त, श्रीमती मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त, (अंबड विभाग) श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सपोनि/गणेश मुगले • गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोना/१३६३ समाधान चव्हाण, पोशि / २०६८ जाधव, पोशि/२८०१ कांदळकर, पोशि/१३६२ नेहे, पोशि/१०८४ कु-हाडे, पोशि/२०५९ ढाकणे, पोशि/ २४८४ बिराजदार, पोशि/२१८६ खैरणार, पोशि/ २८०४ सोनवणे, मपोशि/७७९ खर्डे तसेच पोशि/१५९५ भालेराव नेम गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी पार पाडली असुन पुढील तपास पोउनि/संदिप पवार व पोशि १३६२ दिनेश नेहे हे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!