“सावित्रीच्या लेकी” पोलीस आयुक्तालयाच्या रणरागिनी ! पोलीस आयुक्तालय, नाशिक कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती करण्यात आली मोठया उत्साहात साजरी..!

लाल दिवा-नाशिक,ता.३:-श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनानूसार नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे विविध राष्ट्रपुरुष व राष्ट्रदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येत असुन त्याअंतर्गत आज दिनांक ०३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पोलीस आयुक्त कार्यालयात श्रीमती. मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, नाशिक शहर यांचे देखरेखीत श्रीमती. आसिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, श्रीमती. प्रिया संदिप कर्णिक, यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आजची यशस्वी महिला ही फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच समाजात ताठ मानेने सर्वच क्षेत्रात काम करीत आहे. त्यांचे कार्यास अभिवादन म्हणून विविध क्षेत्रातील महिलांची मान उंचावून महिलांना प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्यात प्रोत्साहीत करणा-या ७२ मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाअंतर्गत सत्कार समारंभ झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले….

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमीत्त नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील महिला त्यामध्ये डॉ. निता गांगुर्डे-प्राध्यापक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापिठ, डॉ. शाहिस्ता इनामदार- सहा.प्राध्यापक, नवजीवन विधी महाविदयालय, श्रीमती. शोभा पवार-माजी सदस्या बाल न्यायमंडळ नाशिक, अॅड. पल्लवी घुले टिळे सदस्या बाल न्यायमंडळ, अॅड. पौर्णिमा नाईक विधी अधिकारी, श्रीमती. पुजा प्रसून-मानसोपचार तज्ञ, श्रीमती. रुचिता ठाकुर-रेडिओ विश्वास, श्रीमती. पल्लवी कुलकर्णी- सहा. संचालक प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळा, श्रीमती. अश्विनी न्याहारकर-सामाजिक कार्यकत्या, डॉ. तेजु सोलोमन उपाध्यक्षा फॅमिली फिजिशियन असोसिएशन, डॉ. संध्या गडाख एम.व्ही.पी. विधी महाविदयालय, श्रीमती. मंदा दिपक कचरे, श्रीमती. भारती शामराव पवार सुयश हॉस्पिटल, श्रीमती. प्रिती अलंकार जगताप, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, श्रीमती. पुजा खैरनार आर्किटेक्ट, श्रीमती. सुनिता पाटील, श्रीमती. अंकिता रामराव मोरे, श्रीमती. दिक्षा प्रकाश सोनवणे कॅमेरामन स्टार २४ फास्ट न्युज, श्रीमती. वैशाली भट, भोसला मिलीट्री शिशु विहार स्कुल, श्रीमती. चारुशिला कुलकर्णी-पत्रकार लोकसत्ता वृत्तपत्र, श्रीमती. सुनिता चव्हाण-पत्रकार न्युज ९, श्रीमती. प्रज्ञा सदावर्ते सामना वृत्तपत्र, डॉ. सुखदा नितीन ठाकरे, जिल्हा रुग्णालय नाशिक, श्रीमती. मोहिनी पवार पत्रकार सप्रेम मराठी न्युज, श्रीमती. जुली सातभाई, श्रीमती. रुचा गोखले-लिटील वंडर्स स्कुल, श्रीमती. अमृता गुंजाळ कनेक्ट अकादमी, श्रीमती. मिनल मोहगांवकर, श्रीमती. सारिका पिचाज, श्रीमती. एडना फर्नांडिस, श्रीमती. साक्षी संगमनेरकर -व्हिसडम हाय स्कुल, श्रीमती. मिनल चौधरी-भोसला इन्स्टीट्युट ऑफ नर्सिंग, श्रीमती. मंजुषा उपासनी, मानसशास्त्र शिक्षक भोसला मिलट्री कॉलेज, श्रीमती. स्वाति भावसार, श्रीमती. अर्चना कोठावदे, श्रीमती. मिनाक्षी गवळी – मराठा विद्या प्रसारक या महिलांचा तसेच पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन व शाखेतील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक तसेच दामिनी,निर्भया पथकातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या महिला अंमलदार यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सर्व उपस्थित महिलांचा गौरव हा महिलांच्याच हस्त करण्यात आला.

सदर कार्यक्रम मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, श्रीमती. मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, नाशिक शहर, श्रीमती. आसिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, श्रीमती. प्रिया संदिप कर्णिक, यांचेसह पोलीस आयुक्त, कार्यालयातील अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ यांचे उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती गौरी चित्तोडकर यांनी व आभार प्रदर्शन मा. श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ नाशिक शहर यांनी केले……

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!