त्रिमूर्ती हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा…. वीस वर्षीय महिला मृत्यू प्रकरण….!
लाल दिवा-नाशिक,ता.४ : त्रिमूर्ती हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत पावलेल्या वीस वर्षीय महिलेला योग्य न्याय देऊन दुर्लक्ष करणाऱ्या डॉक्टरावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. याबाबत अंबड पोलिसांना मृत महिलेचे पती व छावा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
अंबड पोलिसांना दिलेल्या निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे, राजश्री मयुर निकम वय २० राहणार महालक्ष्मी प्राइड, फ्लॅट नंबर ३०४, एकदंत नगर, अंबड, नाशिक. या सिडकोतील त्रिमूर्ती हॉस्पिटल या ठिकाणी ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी सायंकाळी ४ वाजता पोटात दुखत असताना ओमेट झाली. या कारणाने शाश्वत नर्सिंग होम चे डॉ. अविनाश पवार यांच्या सांगण्यानुसार त्रिमूर्ती हॉस्पिटल येथील डॉ. गिरीश बोरकर यांच्याशी संपर्क करून त्या ठिकाणी ॲडमिट होण्यास सांगितले होते..
डिलिव्हरी पेशंट असताना त्या ठिकाणी बोरकर डॉक्टरांनी तपासण्या न करता तेथील शिकाऊ डॉक्टर यांना ट्रीटमेंट करण्यास सांगितले असता १ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता त्या महिलांचे पती मयुर राजेंद्र निकम यांना पेशंट मृत झाले आहे. असे सांगण्यात आले होते.
त्यांचे पती हे आपल्या पत्नी ला बघून सकाळी ४ वाजता घरी आंघोळीसाठी गेले असता. ६ वाजता त्या हॉस्पिटल मधील डॉ. बोरकर यांनी शाश्वत नर्सिंग होम डॉ. अविनाश पवार यांना फोन करून रूग्ण मृत झाल्याचे सांगितले.
हॉस्पिटल मध्ये दाखल करताना त्या ठिकाणी त्यांचे आधार कार्ड देण्यात आले होते. त्रिमूर्ती हॉस्पिटल यांच्या हलगर्जीपणामुळे राजश्री मयुर निकम यांचे निधन झाले. असून त्या हॉस्पिटलने पेशंटचे नाव रिपोर्ट मध्ये चुकीचे टाकले होते. नंतर ते नाव खोडण्यात आले. त्रिमूर्ती हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी कोणतेही कल्पना न देता कोऱ्या कागदावर त्यांचे पती यांच्यासह व अंगठाचे ठसे घेण्यात आले होते. त्यांनी पेशंटचे जे नाव दिले होते. त्यात अफरातर करून नाव हे बदललेले आहे. त्रिमूर्ती हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मृत झालेल्या राजश्री मयुर निकम, वय २० यांना योग्य न्याय देऊन हॉस्पिटल मधील डॉक्टरवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या बाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष हिरे, शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे, मयत राजश्री निकम यांचे पती मयूर निकम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो ओळी
सिडको : त्रिमूर्ती हॉस्पिटलच्या डॉक्टरावर कारवाईचे निवेदन देताना आशिष हिरे, योगेश गांगुर्डे, मयूर निकम
- प्रतिक्रीया
पीएम च्या रिपोर्ट वरून दीड दोन महिन्यात कमिटी बसेल त्यानुसार रिपोर्ट येईल. कोणत्याही पेशंटचा मृत्यू झाल्यानंतर २४ तासाच्या आत त्याचे पीएम करून घेत असतो. रिपोर्ट आल्यावर नक्की काय आहे ते सांगता येईल. यासंदर्भात उपचार करणाऱ्या संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून सांगता येईल.
डॉ. राजेश पाटील, संचालक, त्रिमूर्ती हॉस्पिटल, त्रिमूर्ती चौक, सिडको
- प्रतिक्रीया
पेशंट रुग्णालयात आल्यानंतर त्यांना सर्व उपचार देण्यात आले. त्यांना आयसीयू मध्ये घेण्यात आले.. लागेल ते इंजेक्शन दिले व चाचण्या केल्या. आपण केलेल्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्या. मृत्यूचं कारण न कळल्यामुळे आपण त्यांना पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण कळेल. आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही. त्या गर्भवती नव्हत्या. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता म्हणून त्या उपचारासाठी आदल्या दिवशी रात्री दहा वाजता त्या एडमिट झाल्या होत्या.
डॉ. गिरीश बोरकर, त्रिमूर्ती हॉस्पिटल, सिडको
- प्रतिक्रिया
शाश्वत हॉस्पिटलला पत्नीला ऍडमिट केल्यानंतर छातीत दुखायला लागलं. ओमेटिंग व्हायला लागली. बीपी लो झाला होता. इसीजी ची सुविधा उपलब्ध नसल्याने त्रिमूर्ती हॉस्पिटलला डॉ. निलेश बोरकर यांच्याकडे जाण्यास सांगितले. तेथे हार्टबीट वाढलेले आहेत. ऑक्सिजन कमी असल्यास सांगितले. आयसीयु मध्ये दाखल केले. त्यांनी सलाईम मधून इंजेक्शन दिले. काहीं हातातून दिले. १५ ते १६ इंजेकशन दिले. ब्लड चेक केले. रिपोर्ट नॉर्मल सांगीतले. तीन वाजेपर्यंत सरवर ठीक होते. त्यांनी आय सी यू मध्ये येण्यास नकार दिला. पहाटे घरी आंघोळीला गेलो. पेशंट अत्यवस्थ झाल्याचे सांगितले. सर्वांना बोलविण्यास सांगीतले. सहा वाजता मेल्याचे सांगीतले. ओव्हर डोस दिल्याने पत्नी गेली. हलगर्जीपणामुळे गेली. मला सांगण्याच्या आधी पोलीस आले. अँब्युलन्स आली होती. हे सर्व समशस्पद आहे.
मयुर निकम, पेशंट चे पती