नाशिक मनपा अतिक्रमण उपायुक्त व डॅशिंग महिला अधिकारी करुणा डहाळे यांनी पंचवटी विभागात विशेष अतिक्रमण मोहीम राबविल्याने पंचवटी वासियांनी मानले आभार…!
लाल दिवा, ता. १० : नाशिक मनपाच्या पंचवटी विभागात राबविण्यात येत असलेल्या विशेष अतिक्रमण मोहिमेत अनधिकृत बांधकाम बरोबरच रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले.
यापुढे पंचवटी विभागात अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम ही व्यापक स्वरूपात सुरू रहाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त करूणा डहाळे यांनी दिली.
मनपाच्या पंचवटी विभागात काल (दि.१० मे) रोजी मनपा उपायुक्त करूणा डहाळे यांच्या आदेशानुसार पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत व पंचवटी अतिक्रमण विभागाचे रतन गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अतिक्रमण मोहीमेला प्रारंभ करण्यात आला आहे. काल सर्वप्रथम हिरावाडी लिंकरोड येथील एक अनधिकृत बांधकाम शेड जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आले. तर प्रामुख्याने अमृतधाम येथील अनधिकृत नऊ टपरीधारकांवर कठोर कारवाई करण्यात आली.यावेळी अनधिकृत टपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय आडगांव पोलीस स्टेशन जवळील अनधिकृत दोन टपऱ्यांवर कारवाई करून टपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. संभाजीनगर रोडवरील निलगिरी बाग-भाजीबाजार येथील मोठ्या रहदारीच्या रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांकडूनवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत प्रामुख्याने भाजीपाला व आवश्यक साहित्य जप्तीची कारवाई बरोबरच येथील अनधिकृत दोन टपऱ्या जप्तीची कारवाई करण्यात आली. तसेच आडगांव नाका येथील श्री.काट्या मारुती पोलीस चौकीजवळील रहदारीच्या रस्त्याला अडथळा आणणाऱ्या अनधिकृत मसाला डोसा व्यवसायिकाचे साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. या विशेष अतिक्रमण कारवाई प्रसंगी मनपाच्या सहाही विभागाचे अधिकारी व कर्मचारी वाहनांच्या ताफ्यासह हजर होते. याप्रसंगी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोखपणे पोलीस बंदोबस्त होता. यापुढे रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या भागात विशेष अतिक्रमण मोहीम सुरू रहाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली.
नाशिक : येथील मनपाच्या पंचवटी विभागात विशेष अतिक्रमण मोहीम प्रसंगी अनधिकृत बांधकाम व व्यावसायिक टपऱ्या आणि रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या भाजीपाला व्यावसायिकांना हटवितांना प्रसंगी पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे व पंचवटी अतिक्रमण विभागाचे रतन गायधनी यांच्यासह कर्मचारी आदी