रक्षकच निघाला भक्षक… ……अमेझॉन कंपनीच्या गोडावुन मधुन चोरी करणारा सुरक्षा रक्षक जेरबंद करण्यात यश…..गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड यांची आणखी एक जबरदस्त कामगिरी…..!
लाल दिवा-नाशिक,ता.१० :- :( दि,८)मार्च २०२४ रोजी पहाटे ०२:०० ते ०५:०० वा. च्या दरम्यान अशोका मार्गा वरील अॅमेझोन कंपनीच्या गोडावुन मधुन सुरक्षा रक्षक याने कॅश रूमची चावी घेवुन सेफ कस्टडी चे लॉकर उघडुन त्यातील ८, ५७, हजार रूपये ची रक्कम काढुन चोरी करून ती रक्कम त्याच्या साथीदाराकडे दिली होती. सदर बाबत मुंबईनाका पोलीस ठाणे येथे ७८/२०२४ भादवि कलम ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे बाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट ०१ कडील पथकाने सातत्याने तपास करून गुन्हा घडला परिसरातील सिसिटिव्ही फुटेज तपासुन व तांत्रीक विश्लेषणव्दारे गुन्हा करणारा आरोपीची गोपनीय बातमीदारा मार्फत ओळख पटविली होती. त्यावर सदर आरोपीचे नाव आदिल सैय्यद असे असल्याचे निष्पन्न केले होते. तो गोसावी वाडी परिसारात येणार असल्याची माहीती पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळाल्या वरून गुन्हे शाखा युनिट -१ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुगन साबरे, पोलीस हवालदार देविदास ठाकरे, शरद सोनवणे, पोलीस अंमलदार आप्पा पानचळ, राजेश राठोड, अमोल कोष्टी, चालक समाधान पवार यांनी गोसावी वाडी परिसारात सार्वजनीक शौचालया जवळ साफळा लावुन इसम नामे आदिल जमील सैय्यद वय ३८ रा. अंजुनम उर्दू शाळे जवळ, गोसावी वाडी, नाशिकरोड, नाशिक यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्याचे कडे चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार रामदास संतु टेमगर रा. विहीत गाव, नाशिक यावे सह केल्याची कबुली देवुन गुन्हयातील चोरी केलेल्या रक्कमे पैकी १, लाख रूपये रोख व ०१ मोबाईल असा एकुण १, लाख १५, हजार- रूपये चा मुददेमाल त्याचे कब्जातुन हस्तगत केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उप निरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुगन साबरे, पोलीस हवालदार देविदास ठाकरे, शरद सोनवणे, पोलीस अंमलदार आप्पा पानचळ, राजेश राठोड, अमोल कोष्टी, चालक समाधान पवार यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.