सिडकोत भाजी विक्रेत्या महिलेची छेडछाड, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; संतापजनक प्रकारावरून रोष व्यक्त !

भाजी विक्रेत्या महिलेची छेडछाड प्रकरणी आरोपीला कडक शिक्षेची मागणी! 

नाशिक -दिवसाढवळ्या, आणि तेही व्यवसायाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत, याची धक्कादायक प्रचिती देणारी घटना समोर आली आहे. सिडको परिसरात भाजी विक्री करणाऱ्या महिलेची एका तरुणाने छेडछाड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी या संतापजनक प्रकारामुळे नागरिकांमधून संतापाची लाट पसरली आहे.

दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला सिडको परिसरात आपल्या लोटगाडीवर भाजी विक्री करत होती. त्याच परिसरात आरोपी साद सादीक बागवान (वय २१, रा. भाजी मार्केट जवळ, सिडको) हा तरुण फळे विक्री करत होता. महिलेने एका ग्राहकाला भाजी दिल्यानंतर बागवानने अचानक त्याचा मोबाईल तिच्या हाती दिला. मोबाईलच्या स्क्रीनवर अश्लील व्हिडिओ सुरू होता. 

एवढ्यावरच न थांबता हा तरुण भाजी विक्री करणाऱ्या महिलेला “विक्री झाली नाही का?” असे विचारून तिच्याशी गैरवर्तन करत होता. या प्रकारामुळे महिलेने तात्काळ मोबाईल परत दिला. मात्र, तो काहीही बोलला नाही. या घटनेमुळे महिलेला जबरदस्त मानसिक धक्का बसला असून, तिच्या स्त्री मनाला  लाजिरवाणे वाटले. 

याप्रकरणी पीडित महिलेने धीर दाखवत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी साद सादीक बागवान विरुद्ध भादंवि कलम कलम ७५ (३) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोउनि शेवाळे पुढील तपास करीत आहेत. 

दरम्यान, दिवसाढवळ्या महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.संबंधित आरोपीला कडक शिक्षा व्हावी आणि अशा घटनांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे…

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!