उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयाने विनंती बदल्या तात्काळ कराव्या……पवळे यांचा उपोषणाचा इशारा…..!
लाल दिवा : सध्या आचारसंहिता सुद्धा संपलेली आहे या चालू वर्षी सन २०२४ च्या बदल्या उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक यांनी विशेष विनंती बदल्या ज्यामध्ये दिव्यांग,महिला,गंभीर आजारी कर्मचारी अश्या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.
हे बदल्या एका वर्षात करावे लागतात असं कायदा आहे परंतु नाशिक कार्यालय बदल्या करण्यात टाळाटाळ करतात फक्त प्रशासकीय कारणास्तव बदल्या करतात फक्त त्यावरच जास्त जोर देतात बरेच दिव्यांग कर्मचारी यांचे जिल्ह्याबाहेर बदल्या केलेल्या आहे ते त्रस्त झालेले आहे काहींनी तर आत्महत्या केल्या आहे. जिल्हाबाहेर नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात कर्मचारी तीन वर्षापासून जिल्ह्याबाहेर सेवा करत करत त्रस्त झालेले आहे. त्यांना बी.पी. ,शुगर, मानसिक आजार मोफत भेटलेले आहे. नाशिक कार्यालयाच्या आक्तरीत पाच जिल्हे येतात त्यांना विभागाचा दर्जा आहे तसेच वर्ग ३आणि वर्ग ४ कर्मचारी यांच्या बदल्या जिल्हा बाहेर करू नये असा शासनाचा कायदा आहे.तरी त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांनी न्याय द्यावा तसेच या प्रकरणात मा. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी विशेष लक्ष घालून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.तसेच विनंती बदल्या करण्यात यावे याचा कालावधी तीन वर्षाचा असतो तीन वर्ष झालेल्यांच्या तात्काळ करण्यात यावे तसेच दिव्यांग कर्मचारी यांचे बदल्या शासन निर्णय २०१४ नुसार त्यांचे राहते गावाजवळ करण्यात यावे अन्यथा दि. २१/६/२४ पासून कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ उपसंचालक कार्यालय नाशिक पुढे सर्व कर्मचारी सह आमरण उपोषणास बसणार आहे व याची सर्वस्वी जबाबदारी नाशिक कार्यालयाची राहील. असा इशारा
एन.एम. पवळे, केंद्रीय अध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी,कल्याण महासंघ, महाराष्ट्र राज्य.