गर्भपातास मान्यता देण्याकरिता वैद्यकीय मंडळ स्थापन :- डॉ. चारूदत्त शिंदे….!
लाल दिवा-नाशिक,ता.२४ :- वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 सुधारीत 2021 नुसार जिल्ह्यात वैद्यकीय मंडळ गठीत करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार 24 आठवड्या पलीकडील वैद्यकीय गर्भपातास मान्यता देण्यासाठी जिल्हा रूग्णालय नाशिक येथे वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
स्थापित करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळात अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक तसचे क्ष किरण तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ह्दयरोग तज्ज्ञ, श्वसनविकार तज्ज्ञ, अनुवंशविकार तज्ज्ञ, मानसोपाचार तज्ज्ञ आणि मेंदू विकार तज्ज्ञ अशा नऊ तज्ज्ञांचा समावेश आहे.
गर्भातील बालकास काही प्रकारचे व्यंग असल्यास गर्भवती महिलांना २४ आठवड्या पलीकडील वैद्यकीय गर्भपातास मान्यता देण्यासाठी गठित वैद्यकीय मंडळास पाचरण करता येईल. असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी कळविले आहे.