सारिका सोनवणे प्रकरणाची एस.आय.टी. चौकशी करुन कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे : गजू घोडके

लाल दिवा-नाशिक, ता. २४ : कृषी अधिकारी सारिका सोनवणे यांना खंडणी प्रकरणात हकनाक गोवण्यात आले आहे. यामागे फार मोठे राजकीय व धार्मिक षडयंत्र आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारने एसआयटी मार्फत चौकशी करावी. सदर महिलेच्या कुटुंबीयास पोलीस संरक्षण देणे आवश्यक आहे. असे न झाल्यास आपण मुंबईत उपोषणाला बसू असा सज्जड इशारा सकल हिंदू समाजाचे गजू घोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे, खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राच्या एका विश्वस्ताकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्या प्रकरणी कृषी अधिकारी सारिका सोनवणे यांना नुकतीच अटक करण्यात आली. परंतु हे प्रकरण फारच गुंतागुंतीचे आहे. नाजूक प्रकरण असल्याने समेट आणि आर्थिक देवाण- घेवाण झाल्यानंतर हे प्रकरण खरे तर मिटले होते. मात्र नंतर राजकीय व्यक्ती-लोकप्रातिनिधी व पोलिसांना हाताशी धरून सदर प्रकरणात अबला महिलेस व तिच्या कुटुंबियांना अडकविण्यात आले आहे. न्याय मिळावा यासाठी ती सर्वाची दारे थोतावट होती. मात्र तिला खरा न्याय मिळाला नाही. हीच खरी शोकांतिका आहे. या महिलेने वेळोवेळी खंडणी मागितली. असे म्हणणे गृहीत धरले तरी तिला मोठी रक्कम देण्यासाठी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राच्या विश्वस्ताकडे इतकी रक्कम आली कुठून व ते देण्यामागे त्यांनी नेमकी अशी काय चूक केली. हा खरा सवाल आहे. खंडणी देणाऱ्याच्या विरोधात गुन्हा का दाखल झाला नाही. याचेही कारण गुलदस्त्यातच आहे. सदरच्या (खऱ्या) व्हिडिओची फॉरेन्सिक लॅबकडून खातरजमा करण्यात येईल. असे आश्वासन विधिमंडळात गृहमंत्र्यांनी दिले होते. मात्र त्याचा अहवाल अद्याप न आल्याने या प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. व्हिडिओ भलत्याचाच आणि ते दुस-याच्याच नावाने ढकलून त्याच्या नावाने फिर्याद देण्यात आली. असा आमचा आरोप आहे. या प्रकरणाचे सत्य हुडकून काढायचे असेल आणि सदरच्या महिलेस न्याय मिळवून द्यायचा असेल तर एसआयटी मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तोपर्यंत सदर महिलेस व तिच्या कुटुंबियांस पोलीस संरक्षण मिळाला हवे. तसेच दिडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी समोर येऊन सत्य परिस्थिती सर्वाना सांगणे गरजेचे आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने या महिलेस मदत करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारझोड झाल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य उघडकीस यावे याचा विडा आम्हीं उचलला असून सदरच्या महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत लवकरच उपोषणास बसण्याचा निर्धार केला आहे. या प्रकरणात सकल हिंदू समाजास गोवण्याचा होत असलेला प्रयत्न चुकीचा आहे. हिंदू सकल समाजाचा या प्रकरणाची काडीचाही संबंध नाही. याची सर्वांनी दखल घ्यावी. धार्मिक गोष्टींच्या नावाखाली होत असलेले थोतांड थांबावे आणि धार्मिक स्थळांच्या प्रमुखांचे आचरण शुद्ध असावे हीच माफक अपेक्षा आहे. सारिका सोनवणे हिला न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असून न्याय न मिळाल्यास त्यासाठी उपोषणास बसणार आहे. अशा आशयाचे निवेदन सकल हिंदू समाजाचे गजू घोडके यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

फोटो ओळी

 

नाशिक : नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना सकल हिंदू समाजाचे गजू घोडके

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!