पंचवटी! प्रियंका वमावे खून प्रकरणी अवघ्या ३ तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात ; पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक शहर गुन्हेशोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी…!

लाल दिवा-नाशिक,ता २४:- मा. श्री. मंदिप कर्णिक माो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १. नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, महा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी नाशिक शहरात शरिराविरूध्दचे गुन्हे घडणार नाही याबाबत खबरदारी घेणे बाबत आदेशित केले होते.

 

दिनांक २३/०१/२०२४ रोजी सकाळी १०:०० वा. चे सुमारास पंचवटी पोलीस स्टेशन कडील डायल ११२ मात्राईल वाहनाम कॉल आला की. एक स्त्री जातीचा मृतदेह रामबिहारी लिंक रोड, मिग लॉन्म जवळील मोकळ्या मैदानात पडलेला अमत्र्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर डायल ११२ चे वाहन लागलीच मदर ठिकाणी पोहचुन सदरची माहिती वपानि/माहन मार यांनी कळविल्याने वपोनि/मोहन माछरे व गुन्हेशोध पथक हे लागलीच मदर ठिकाणी पोहचले. मदर ठिकाणी पोहचल्यानंतर पर्गिस्थनांचा आढावा घेवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मोहन माछरे यांनी मपोनि रोहित केदार, पोहवा/६९२ अनिल गुंबाड, पाहवा /१६९८ दिपक नाईक अमे पथक तपामाकरीता रवाना केले. मदर पथकाने मानवी कौशल्याचा वापर करून मदर मृतदेहाची ओळख पटवून तिचे नाव प्रियंका विजी वमावे मुळ रा. मु. पाटबारा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार असे असल्याची माहिती मिळाली. त्यानंत प्रियंका वसावे हि शिक्षण घेत असलेल्या कॉलेजला जावुन अधिका अधिक तपास उपयुक्त माहिती प्राप्त केली असता त्यानकाहा मोबाईल क्रमांक प्राप्त होताच त्याचे तांत्रिक विश्लेषण करून त्या आधारे एक संशियित मोबाईल कमांक प्राप्त करण्यात आल्यानंतर त्याची अधिक माहिती मिळविली असता सदरचा मोबाईल कमांक मागर चिवदास तडवी मुळ रा. अक्कलकुवा, नंदुरबार याचा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हेशोध पथकाचे सपोनि रोहित केदार, पोहवा /६९२ अनिल गुंबाडे, पोहवा/१६९४ दिपक नाईक यांनी मानवी व तांत्रिक कौशल्याचा वापर करून सपोनि रोहित केदार, मपोनि/ मिथुन परदेशी व गुन्हेशाध पथक यांनी दान पथकांसह मापळा लावुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले आहे.

 

त्यानंतर मागर तडवी याचेकडे इन्ट्रोगेशन केले असता तसेच त्याची वैदयकिय तपासणी होवुन त्याचे शरीराच्या जखमांबाबत सखोल विचारपुस केली असता सागर तडवी याने कबुली दिली की, दिनांक २२/०१/२०२४ रोजी प्रियंका वमावे हि सागर तडवी याचे चुंचाळे शिवार येथील रूमवर त्याला भेटण्यासाठी गेली होती. दरम्यान दिवसभरात त्यांचेत प्रियंका हि दुस-चा मुलाबरोबर फोनवर बोलत असते व चॅटिंग करते या कारणावरून वाद सुरू होता. त्याचेच रागातुन सागर तडवी यांने दिनांक २३/०१/२०२४ रोजी रात्री ०१:०० ते ०१:३० वा. चे सुमारास ओढणीचे सहायाने प्रियंकाचा गळा आवळुन तिची हत्या करून तिचा मृतदेह दुचाकीने रामबिहारी लिंक रोड, मिरा लॉन्स जवळील मोकळ्या जागेत टाकून दिला बाबत तपासा दरम्यान सांगितलेले आहे. त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हयाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच मृत प्रियंका वसावे हिचा मृतदेह विल्हेवाट लावणे करीता मागर तडवी याने कोणाची मदत घेतली आहे याचा शोध सुरू आहे.

 

मदरची कामगिरी श्री. मंदिप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, महा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर वपोनि मोहन माछर, पोनि/बगाडे (प्रशासन), पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सपोनि रोहित केदार, मपानि/मिथुन परदेशी, पोहवा ६९२ अनिल गुंबाडे, पोहवा/१२०६ सागर कुलकर्णी, पोहवा / १६९४ दिपक नाईक, पोहवा ३९१ कलाम शिंदे, पोना/२५४ निलेश भोईर, पोना/१०२ संदिप मालसाने, पोना /१२६९ उत्तम पवार, पोशि/ २५०७ वैभव परदेशो. पाशि/११६५ महाले अशांनी संयुक्तिकरित्या कामगिरी केलेली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि विलास पडोळकर करीत आहेत.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
2
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!