नाशिकरोडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना; गुन्हा दाखल…!
लाल दिवा-नाशिकरोड,दि.३० : येथील पळसे भागात एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०३:३० वाजण्याच्या सुमारास घरात घुसून एका नरापिधाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या राहत्या घरी जबरदस्तीने घुसला आणि त्यांच्या अल्पवयीन गतीमंद मुलीला ओढून नेले. आरोपीने मुलीला हातचापटीने मारहाण करून तिच्या अंगावरील कपडे काढले आणि लैंगिक अत्याचार केले.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५२/२०२४ नुसार भादंवि कलम ६४ (२) (एफ), ६४ (२) (आय), ६४ (२) (के) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम ४, ६, १० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बिडकर हे पुढील तपास करत आहेत.