घरफोडी करणाऱ्यास सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले !
लाल दिवा : अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत एका सराईत घरफोडी करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून जवळपास ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोलीस हवालदार पवन परदेशी आणि तुषार मते हे रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना माहिती मिळाली की, अज्ञात चोरटे चोरी करून दुचाकीवरून पळुन जात आहे. माहिती मिळताच त्यांनी संशयित चोरट्यांचा पाठला चेकमेट न्यूज यावेळी चोरटे व पोलिसांमध्ये झटापट दखाल झाल पोलिसांनी मोठे धाडस दाखवत घरफोडी करून पळून जाणाऱ्या एका सराईत संशयितास सिडकोतील बडोदे नगर भागात झडप मारून पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन त्याचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असता पोलीस खाक्या दाखवताच त्याने आपले नाव रामसिंग धनसिंग भोंड (३२, रा. भीमवाडी गंजमाळ भद्रकाली) असे सांग चेकमेट न्यूज ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.
या संशयित आरोपीविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा, लातूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. या संशयित आरोपीकडून ८ तोळे ५० मिली ग्राम सोने, एक दुचाकी, घरफोडी करण्याचे साहित्य असा एकूण ६ लाख ६० हजार ३५० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई अंबड पोर चेकमेट न्यूज पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण सेंदळे, पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग घुनावत, पोलीस कर्मचारी पवन परदेशी, सचिन करंजे, अनिल गाढवे, तुषार मते, संदीप भुरे, समाधान शिंदे, राकेश राऊत, पवार, कुणाल राठोड, पाटील, जाधव, निकम, पाटील यांच्या पथकाने केली आहे.