खंडणी विरोधी पथकाची कामगिरी.भद्रकाली पो. स्टे. च्या रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात….!

लाल दिवा -नाशिक,दि.१७ : भद्रकाली पोलीस स्टेशन १) गु.र.नं. ६९ / २०१६ भा.द.वि. ४२०, ३८४, ३८५,३४, २) गु.र.नं. २८०/२०१६ भा.द.वि. ३५४, ३८४, ४५२, ३२३, ५०४, ५०६ सह म.पो. का. १३५ प्रमाणे, ३) ॥ गु.र.नं. ३० / २०२८ | महा. पो. अधि. १४२ प्रमाणे, ४) ॥ गु.र.नं. २८४ / २०१८, महा. पो. अधि. १४२ प्रमाणे, ५) गु.र.नं. १५८ / २०२३ भा. द. वि. ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ या गुन्हयातील हद्दपार इसम नईम अब्बास शेख हा मथुरा हॉटेल, द्वारका, | नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी गुप्त बातमीदारा मार्फत खंडणी विरोधी पथकातील पो. ना. ९११, | दत्तात्रेय चकोर व पो. अं. २३९२ स्वप्नील जुंद्रे यांना मिळाली होती.

 

त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन हद्दपार आरोपी | नईम अब्बास शेख, वय ३४ वर्षे, व्यवसाय- चालक, रा. घर नंबर ३६५९, भोई गल्ली, बागवानपुरा, भद्रकाली, नाशिक यास मथुरा हॉटेल, द्वारका, नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास व कारवाई कामी भद्रकाली पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त साो. नाशिक, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, मा. श्री. डॉ. सिताराम कोल्हे, सपोआ गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी | पथकातील पोनि. विदयासागर श्रीमनवार, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, पोउनि. दिलीप भोई, सपोउनि. दिलीप सगळे, | पोहवा. किशोर रोकडे, पोहवा. राजेश भदाणे, पो.ना. योगेश चव्हाण, पो. ना. दत्तात्रेय चकोर पो. अं. भुषण सोनवणे, पो.अं. चारूदत्त निकम, पो. अं. स्वप्नील जुंद्रे, पो. अं. मंगेश जगझाप व मपोशि. सविता कदम यांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!