तहसीलदारांचा राजीनामा मंजूर होताच देवळाली मतदारसंघातील उमेदवारांच्या पाया खालची वाळू घसरली की राव….! डॉ. राजश्री अहिरराव भाजपच्या वाटेवर….?
लाल दिवा-नाशिक,ता.५ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार राजश्री अहिरराव यांचा राजीनामा, अखेर शासनाने मंजूर केला. दोन महिन्यांपूर्वी अहिरराव यांनी तहसीलदार (सामान्य प्रशासन) पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा मंजूर झाल्याने अहिरराव आता राजकारणात अधिक सक्रिय होणार असून त्या आता कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील याविषयीची उत्सुकता राहाणार आहे. अहिरराव या देवळाली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांचा राजीनामा यामुळे चर्चेत होता. तहसीलदार असतानाच त्यांनी देवळाली मतदारसंघात वाढविलेला संपर्क आणि राबविलेले शासकीय उपक्रम यामुळे विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती. उभयतांमधील हा वादही मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला होता. मागील पंचवार्षिकमध्येच अहिरराव यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती, त्यावेळीही त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. परंतु, त्यांनी वेट अॅन्ड वाँचची भूमिका घेत आपली शासकीय सेवा सुरू ठेवली. सन २०२४ ची विधानसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केल्याने अहिरराव कधीही राजीनामा देतील अशी चर्चा असताना त्यांनी गेल्या ऑक्टोबर २०२३ मध्ये तहसीलदार पदाचा राजीनामा दिला होता.
- भाजपच्या संपर्कात
अहिरराव या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याबाबतचा सस्पेन्स कायम असला तरी त्या भाजपच्या संपर्कात असल्यामुळे त्या भाजपत प्रवेश करू शकनील अशी शक्यता आहे. गत पंचवार्षिकमध्ये त्यांच्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी असे दोन्ही पर्याय होते. यावेळी त्या भाजपकडून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे कळते.