एकापाठोपाठ एक धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या व नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनू पाहणाऱ्या उपायुक्त मोनिका राऊत यांचा व्यापारांकडून जाहीर सत्कार….. सोबत सहायक पोलीस उपायुक्त आनंदा वाघ व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांचा देखील सत्कार करण्यात आला…..
लाल दिवा-नाशिक,ता.५ :- नाशिकरोड, वडनेर पाथर्डी रस्त्यावर डोक्यावर कोयत्याने वार करून 1 लाख ६८ रुपये लुटणाऱ्याना काही दिवसातच जेरबंद करण्यात आल्याने व्यापाऱ्यांच्यावतीने पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह पथकाचा सत्कार करण्यात आला.
वडनेर पाथर्डी रस्त्यावर 18 डिसेंबरला कार मधून आलेल्या चौघांनी दुचाकीला कट मारला. खाली उतरून प्रकाश मरसाळे यांच्याकडील एक लाख ६८ हजार रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मरसाळे यांनी विरोध केला असता कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार करून बॅग हिसकावून पळ काढण्यात आला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगाने तपास चक्र फिरवण्यात आले. पोलिसांच्या पथकाने अवघ्या आठ दिवसातच आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईने व्यापारी वर्ग सुखावला. उपायुक्त राऊत यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ , उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, गून्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई अनिल शिंदे, जयंत शिंदे, पंकज कर्पे, सुरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रगतवान , राहुल जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजनशेठ बच्चूमल, गोरख अहिरे, नारायण कारडा,अतुल ठक्कर, प्रकाश अलठक्कर, सुनील महाले, जगदीश आडके, ललित समनानी, भूपेंद्र सिंग, शेखर ठक्कर, सचिन भालेराव, बाळासाहेब भालेराव, दीपक बनसोडे, विजय भालेराव, सोनू रणधीर, प्रकाश भालेराव, विश्वनाथ भालेराव, कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते….