जितेंद्र आव्हाडांचे नाक कापणार : अनिता भामरे, शहर उपाध्यक्ष, भाजप…!
लाल दिवा-नाशिक,ता.५ : प्रभु श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक शहरात पाऊल ठेवल्यास मी स्वतःच त्यांचे नाक कापणार अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपच्या शहर उपाध्यक्षा अनिता भामरे यांनी व्यक्त केली आहे.
प्रभु श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराचे व श्रीरामाचे अतूट नाते आहे. याच नाशिक मधील तपोवनात रावणाची बहीण शूर्पणखाचे नाक लक्ष्मणाने कापले होते. अयोध्येतील होत असलेल्या श्रीराम मंदिरात २२ जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असतांना अवघे वातावरण राममय झाले आहे. देशभरात आनंदाचे वातावरण असतांना बेताल वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले प्रभु श्रीराम मांसाहारी होते असे आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अनिता भामरे यांनी आ जितेंद्र आव्हाडांनी नाशिक शहरात पाऊल ठेवल्यास मी स्वतःच आव्हांडाचे नाक कापेल अशी भावना व्यक्त केली आहे.