सराईत गुन्हेगार एक वर्षाकरीता तुरुंगात जेरबंद नाशिक शहर पोलीस आयुक्तांची कारवाई..!
लाल दिवा, ता. २० : उपनगर पोलीस ठाणे हद्दीत इसम नामे सचिन उर्फ घोड्या मधुकर तोरवणे, वय २७ वर्ष, रा. सिध्देश्वर नगर, जुना सायखेडा रोड, गणेश वाटीका रो हाउस, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक याने त्याची नारायणबापुनगर, लोखंडे मळा, दसक, जुना सायखेडा रोड, जेलरोड, नाशिकरोड आणि नजीक लगतच्या परिसरात दहशत कायम रहावी यासाठी त्याने धारदार शस्त्रांचा धाक दाखवुन, जबर दुखापत, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग करणे, लुटमार, गैरकायदयाची मंडळी जमवुन मारहाणकरुन लोकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते, त्याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध होणेसाठी त्यास एम. पी.डी.ए. कायदा १९८१ चे कलम ३ (१) अन्वये दिनांक ०८/०८/२०१९ रोजी पासुन ०१ वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आले होते.
इसम नामे सचिन उर्फ घोड्या मधुकर तोरवणे याचेवर वरिलप्रमाणे कारवाई केलेली असतांना देखील त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्य चालु ठेवल्याने पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी त्यास मध्यवर्ती कारागृह, नाशिक रोड येथे एम.पी.डी.ए कायदा सन १९८१ चेकलम ३(२) अन्वये स्थानबध्द करणे बाबतचे आदेश दिनांक १८/०५/२०२३ रोजी जारी केले आहे, व त्याप्रमाणे त्यास नाशिकरोड, नाशिक कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
इसम नामे सचिन उर्फ घोड्या मधुकर तोरवणे, याचे विरूध्द उपनगर पोलीस ठाणे व पिंपळनेर पोलीस ठाणे, ता. साक्री, जि.धुळे येथे गुन्हे दाखल आहेत जसे घातक हत्यारांनी इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा, नुकसान करुन आगळीक करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, दरोडा, इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे, घातक हत्यारांनी जबर दुखापत पोहचवणे, विनयभंग करणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होउन दंगा करणे, स्फोटक पदार्थ याद्वारे आगळीक करणे, जबरी चोरी करणे इत्यादी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापुर्वी दि. ०४/०५/२०२३ रोजी सराईत गुन्हेगार गणेश उर्फ छकुल्या मधुकर वाघमारे यास मा. पोलीस आयुक्त यांनी ०१ वर्षाकरीता तुरुंगात स्थानबध्द केले आहे.
पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी नमुद इसमाने नाशिक शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत केल्याने नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आबाधीत राहावी त्यासाठी एम. पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची प्रतिबंधक कारवाई केल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांनी सदर कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे. यापुढे देखील नाशिक शहरातील जवजीवन विस्कळीत करणाऱ्या व समाज स्वास्थ्य बिघडविणाऱ्या इसमांवर एम. पी. डी.ए. कायदयाच्या तरतुदीनुसार
प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.
Очень полезно узнать о различных способах связи с потенциальными покупателями на доске объявлений.