उत्तरप्रदेशातील चंदोली येथुन पळवुन आणलेल्या अल्पवयीन मुलीसह दोन जण ताब्यात…!
क्राईम ब्रेन्च युनिट – २ ची कामगीरी…
लाल दिवा : पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी अल्पवयीन मुलींच्या होत असलेल्या अपहरण तसेच फरार आरोपी इत्यादींवर कारवाई करण्याबाबत गुन्हेशाखेस सुचना केल्या होत्या.
प्रशांत बच्छाव साो. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे पथक अल्पवयीन मुलींच्या होत असलेल्या अपहरण तसेच फरार आरोपीतांचा शोध घेत असतांना दि.२५/०३/२०२४रोजी सपोउपनि विवेक पाठक यांना बातमी मिळाली की, उत्तरप्रदेश चंदोली येथुन दोन इसमांनी एका अल्पवयीन मुलीस पळवुन आणुन ते सध्या दत्तनगर, अंबड या भागात वास्तव्यास आहे अशी बातमी मिळाल्याने तागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विद्यासागर श्रीमनवार मार्गदर्शनान्वये दत्तनगर, अंबड येथे सापळा रचुन इसम नामे-१) गोरख मिठठु बिंद वय-२१ वर्षे २) अभिषेक गोपाल मौर्या वय-१८ वर्षे रा. चन्दाईत, बबुरी जि. चंदौली (उ.प्रदेश) तसेच अपहृत अल्पवयीन मुलगी यांना ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी अंबड पोलीस ठाणेस वर्ग केले आहे.
सदरची कामगीरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट कं.२ कडील पोलीस उपनिरीक्षक पगारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक पाठक, महीला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, सुनिल आहेर यांनी केलेली आहे.