पोलीस आयुक्त मुख्याध्यापकाच्या भूमिकेत तर पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत…!
लाल दिवा-नाशिक,१६ : शहर पोलीस आयुक्तलय मध्ये मा. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना नुसार पोलीस शिपाई ते सहा. पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत च्या अमलदार यांचेकरिता पंधरा-पंधरा दिवसाचे उजळनी सत्र प्रशिक्षण नियमितपणे आयोजित केले जाते, सदर उजळणी सत्र हे मा. पोलीस उपायुक्त मुख्यालय व मा. सहा. पोलीस उपायुक्त प्रशासन यांचे देखरेख व मार्गदर्शना नुसार चालविले जाते.
दिनांक 04/12/2023 रोजी पासून उजळनी सत्र क्र. 5 सुरु करण्यात आले होते. सदर सत्रात सर्व पो. स्टे., विविध शाखा येथील 27 महिला / पुरुष पोलीस अमलदार याना इन डोअर व आउट डोअर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
इन डोअर प्रशिक्षणा मध्ये विविध कायदे,गुन्हे तपास, मानसिक आरोग्य, आर्थिक व वेळेचे व्यवस्थापन याबाबत पोलीस उपनिरीक्षक. सपोनि, पोनि, सपोआ, पोलीस उपायुक्त दर्जा चे पोलीस अधिकारी अधिकारी, व संबधित विषया चे तज्ञ यांचे कडून मार्गदर्शन केले जाते.
तसेच आउट डोअर प्रशिक्षण मधे पी टी, परेड तसेच हत्यारे चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षणचा हेतु म्हणजे पोलीस अमलदार यांना कायदे तसेच इतर विषयची माहिती देवून त्यांचे ज्ञान अद्यावत करुन त्याला उजळनी देन्याचा आहे. सदर सत्र मधे प्रशिक्षणार्थी अमलदार यांची झालेल्या प्रशिक्षण बाबत परीक्षा घेण्यात आली असून त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय अमलदार निवड करण्यात आले.
आज दिनांक 16/12/2023 रोजी सदर उजळनी सत्र क्र. 5 मधील सर्व प्रशिक्षणार्थी अमलदार याना मा. पोलीस उपायुक्त मुख्यालय यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात येऊन शुभेच्छा सह निरोप समारंभ साजरा करण्यात आला…..