“योग्य मार्ग, यशाची गुरुकिल्ली!” : उपायुक्त खांडवी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नाशिक पोलिसांचा अनोखा उपक्रम: ‘राईट टर्न’ अंतर्गत उपायुक्त खांडवी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

लाल दिवा-नाशिक, ८ ऑक्टोबर २०२४ (प्रतिनिधी) – “स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमांतर्गत नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी ‘राईट टर्न’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम आज मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका, शिवाजी नगर येथे आयोजित करण्यात आला होता.

सकाळी १० वाजता सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, मुख्यालय वाहतूक, नाशिक शहर यांनी भूषविले होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुधाकर सुरुडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक विभाग, नाशिक शहर आणि श्री. बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, मनपा नाशिक उपस्थित होते.

कार्यक्रमात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने २६ जानेवारी २०२४ च्या परेडमध्ये सहभागी झालेल्या इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनींना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना ‘एसपीसी’ प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत खांडवी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. योग्य मार्गाने वाटचाल केली आणि चांगली संगत असेल तर यश नक्की मिळते, असे ते म्हणाले. त्यांनी सायबर क्राईम, गुड टच बॅड टच, व्यसनाचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा, वाहतुकीचे नियम, विविध गुन्हे व शिक्षा याबाबतही मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे श्री. बी. टी. पाटील यांनी ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, योग्य दिशेने, योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. ‘राईट टर्न’ उपक्रमाची माहिती घेत त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्री. प्रकाश शेवाळे, मुख्याध्यापक श्री. अरुण दातीर, श्री. राहणे, श्रीमती स्मिता खैरनार, श्रीमती छाया गोसावी, नाशिक पोलीस हवालदार सचिन जाधव, श्री. सुरेश खांडबहाले, विठ्ठल भोये, कमलेश खैरनार उपस्थित होते.

श्री. पाखलेसर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सचिन जाधव, पोलीस हवालदार, ‘एसपीसी’ प्रोग्राम यांनी प्रास्ताविक केले. श्री. खांडबहाले यांनी आभार मानले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!