आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन……!
लाल दिवा-नाशिक,ता.११ : आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने दिल्लीत “आप” सरकारला कायदे बनविण्याचा आणि नोकरशांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या अध्यदेशा विरोधात जोरदार निषेध आंदोलन इंदिरा गांधी पुतळा शालिमार येथे करण्यात आले.
……………………
भाजपा सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टाच्या आदेशालाही न जुमानता केंद्रातील बहुमतात बीजेपी सरकार मनमानी पद्धतीने वटहुकूम काढून सुप्रीम कोर्टाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवते. येणाऱ्या काळात या हुकूमशाही सरकारला जनता कायमस्वरूपी घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता इथून पुढे मोदी सरकारने घ्यावी. बीजेपी सरकारने दिल्ली सरकारच्या विरोधात काढलेल्या अध्यादेशा विरोधात जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आले. त्याप्रसंगी गिरीश उगले पाटील अध्यक्ष नाशिक रोड देवळाली विधानसभा एडवोकेट प्रभाकर वायचळे अध्यक्ष मध्य विधानसभा योगेश कापसे अध्यक्ष नाशिक पूर्व विधानसभा श्वेतांबरी आहेर महिला अध्यक्ष, मंजुषा जगताप, निर्मलाताई दानी, जयश्री जाधव, अमोल लांडगे, स्वप्नील घीया, अनिल कौशिक, अल्ताफ शेख, चंद्रशेखर महानुभाव, संतोष राऊत, नविंदर सिंग आलूवालिया, चंदन पवार, अमर गांगुर्डे,बाळासाहेब बोडके, डॉ. जयवंतकुमार महाले, प्रकाश कनोजे आदीं