सिडको महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना दिंडोरकर यांचे पोलिसांना निवेदन…!

सिडको : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याबाबत आक्षेहार्त ट्विट केल्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीकरिता भारतीय जनता पक्षाच्या सिडको महील मोर्चा अध्यक्ष अर्चना दिडोरकर यांनी अंबडची वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.

   निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रतिनिधी समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक स्वरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करीत आहेत. जिथे जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आम्ही आवाज उठवतो. पण सध्या आमच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्रहनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. हे पाहता एक महिला म्हणुन आम्ही शांत बसु शकत नाही.

आव्हाड यांनी ९ जुन रोजी रात्री १२ वाजून ५३ मिनिटांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकुर ट्वीटरवर अपलोड केला आहे. चित्रा वाघ यांनी मानहानी करण्याचा त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जिवनातुन उठवण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

    जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. हे सहन केले जाणार नाही. म्हणून महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्वीटरवरून बदनामी, मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकुर ट्वीटरवर टाकल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी असे निवेदन 

 अर्चना संदीप दिंडोरकर , अध्यक्ष महिला मोर्चा नवीन नाशिक यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन केले आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!