विदेशी दारू वाहतूक करताना एक जण ताब्यात युनिट -२ ची कारवाई….!
लाल दिवा : आज तारीख 14 /5/ 2023 रोजी पोलीस हवालदार- गुलाब सोनार यांना माहिती प्राप्त झाली की इसम नामे- राजाराम पुंडलिक पाळदे वय 43 राहणार अंबड गावठाण, लहवित, तालुका जिल्हा नाशिक हा त्याच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच 15 डीबी 1929 तिचेवर विदेशी दारूचे वेगवेगळे कंपनीचे माल किंमत रुपये 5775/- व 50000/- मोटरसायकल असा एकूण 55775/- रुपयाचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना वर्कशॉप, रेल्वे लाईन जवळ देवळाली कॅम्प येथे मिळून आल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ पोलीस हवालदार गुलाब सोनार, अतुल पाटील ,प्रकाश बोडके, शंकर काळे अशांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस हवालदार सोनार यांनी तक्रार दिल्यावरून देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे गु.र.न. नंबर 106 /2023 महाराष्ट्र प्रो. कायदा कलम 65 (अ)(ई) प्रमाणे कारवाई केली आहे