गद्दारांबरोबरच भाजपाला धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे -बबनराव घोलप महानगरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार…!
लाल दिवा-नाशिक,ता.२८ : आगामी निवडणुकीत नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा(ठाकरेगट) भगवा फडकविण्यासाठी तसेच गद्दारांना आणि भाजपाला धडा शिकविण्यास आतापासूनच सज्ज रहा,असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी केले
पक्षाच्या महानगरातील नवनियुक्त विधानसभा प्रमुख, महानगर समन्वयक,महानगर संघटक,विधानसभा समन्वयक, विधानसभा संघटक,उप महानगरप्रमुख,उप महानगर संघटक, उप महानगर समन्वयक, विभागप्रमुख,विभाग संघटक, विभाग समन्वयक,उप विभागप्रमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन शालिमार कार्यालयात सत्कार करण्यात आला.त्यावेळी या सर्वांना मार्गदर्शन करतांना घोलप बोलत होते.
व्यासपीठावर उपनेते सुनील बागुल,सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,जिल्हाप्रमुख विजय करंजकर,महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे,कृ.ऊ.बाजार समिती उप सभापती उत्तम खांडबाहाले,युवासेना जिल्हाधिकारी राहूल ताजनपूरे,भा.वि.से.जिल्हा संघटक वैभव ठाकरे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,सुभाष गायधनी,शैलेस सुर्यवंशी,महानगर समन्वयक नितीन चिडे,नगरसेवक भागवत आरोटे,प्रशांत दिवे,मधूकर जाधव,संतोष गायकवाड ग्राहक कक्ष जिल्हा संघटक आनिल गायखे,म.आ.मा.जिल्हा संघटक मंदा दातीर आदी होते.
महापालिकेच्या निवडणुका मित्र पक्षांबरोबर एकत्र की स्वतंत्रपणे लढायच्या याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.मात्र आपण सर्वांनी आतापासूनच सर्वशक्तींनीशी तयारीला लागणे गरजेचे आहे,असे उपनेते सुनील बागुल यांनी सांगितले.महानगरात आपल्या पक्षाची मोठ्या प्रमाणात संघटना बांधणी झाली आहे.आता कार्यकर्त्यांची मोट बांधून त्याचा विस्तार करणे गरजेचे आहे,असे सहसंपर्क नेते दत्ता गायकवाड आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले.पक्षातून गद्दार गेल्याने आता पक्ष खऱ्या अर्थाने शुद्ध झाला आहे.त्यामुळे कोण गेले याचा विचार न करता गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणे हेच आपले आद्य कर्तव्य असून त्यादृष्टीने स्वतःला कामास जुंपून घ्या असा सल्ला जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिला.
नाशिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जिल्हा आहे.आतापर्यंत नाशिक महानगरात ठाकरे गटाचाच बोलबाला राहिला आहे.तुमची पक्षनिष्ठा पक्षाबद्दलची समर्पित भावना लक्षात घेऊनच पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये तुम्हाला ही पदे बहाल करण्यात आली आहेत. तुम्ही या पदाला पुरेपूर न्याय द्याल आणि पक्षाचे विचार घरोघरी पोहोचविण्याचे कार्य आतापासूनच कराल अशी अपेक्षा बाळगतो.आपणास एकाच वेळी अनेक शक्तींचा मुकाबला करायचा आहे गद्दार हे तर आपले पहिले लक्ष्य आहे.परंतु भाजपालाही धडा शिकवून आपल्याला महापालिकेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्व शक्तीनिशी सज्ज राहायचे आहे,असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या मनोगत सांगितले.