भद्रकाली पोलिसांची जबरदस्त कामगिरी : यवतमाळ जिल्हयातील शाळेचे सहिलीकरीता आलेल्या शिक्षक व विदयार्थी यांचे चोरी झालेले एकुण १८ मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार जेरबंद….!
लाल दिवा -नाशिक,ता.१५ : दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी नारायण लिला, इंश्लिश मिडीयत स्कुल, ता. आर्णि, जि. यवतमाळ या शाळेची शिक्षक व विदयार्थी मिळुन ९४ जण हे सहलीकरीता नाशिक शहरात आले होते. नाशिक शहरातील देवदेवतांचे दर्शन घेतल्या नंतर सहलीतील सर्व विदयार्थि व शिक्षक हे गोदाघाटा येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा, नाशिक येथे मुक्कामा करीता थांबलेले सर्व विदयाथी व शिक्षक हे धर्मशाळेतील हॉल मधे त्यांचे कडील मोबाईल चार्जिंगला लावुन झोपले असता पहाटेच्या सुमारास सहिलकरीता आलेले विदयार्थि व शिक्षक गाढ झोपलेले असताना सदर धर्मशाळेच्या उघडया शटर मधुन अज्ञात चोरटया इसमाने प्रवेश करून चार्जिंगला लावलेले व विदयार्थि यांनी उशाशी ठेवलेले एकूण २० मोबाईल हॅन्डसेट किंमत १,६०,०००/- चोरून नेल्याने त्याबाबत भद्रकाली पोलीस ठाणे येथे दि. २६/१२/२०२२ रोजी । गुन्हा रजि.नं. ४३१/२०२३ भादंवि कलम ३८० अन्वये दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन अटक करणे बाबत मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, मा.श्री.डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग, नाशिक शहर यांनी सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने भद्रकाली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र पाटिल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती तृप्ती सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि / सत्यवान पवार व अंमलदार यांनी भद्रकाली पोलीस ठाणेचे अभिलेखावरील वरील नमुद दाखल गुन्हा व मालमत्ते विरूध्दचे इतर गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने योजना आखुन सदर गुन्हयांचा मानवी कौशल्याने अज्ञात चोरटया इसमाचा शोध घेत असताना भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सागर निकुंभ सदर गुन्हयातील अज्ञात चोरटा हा व्दारका सर्कल या ठिकाणी संशयित रित्या फिरत असल्याची मिहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने लागलीच त्यास ताब्यात घेतले असता तो अभिलेखावरील सराईत मोबाईल चोरी करणारा आरोपी शफिक तौफिक शेख, ३६ वर्षे, काम-फिरस्ता, रा- गल्ली नं ०१, लोमाणी नगर, मालेगाव, जि- नाशिक, असे असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असुन त्याचेकडुन गुन्हयातील गेले मालापैकी विविध कंपन्याचे मिळून एकूण १,५०,०००/- रू किंमतीचे १८ मोबाईल हस्तगत करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सत्यवान पवार व भद्रकाली गुन्हे शोध पथक हे करीत आहे.
"तिळगुळ घ्या गोड गोड बोला"
मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !#HappyMakarSankranti pic.twitter.com/nOsBQISXCN— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) January 15, 2024
सदरची कामगिरी मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, मा.श्री. डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. गजेंद्र पाटिल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती तृप्ती सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार, पोह/नरेंद्र जाधव, संदिप शेळके, पोना / लक्ष्मण ढेपणे, महेशकुमार बोरसे, पोशि/सागर निकुंभ, धनंजय हासे, योगेश माळी, नारायण गवळी यांनी पार पाडली आहे..