निवडणूक प्रक्रिया बहुतांश शांततेत पार पडली; मारहाण प्रकरणी पोलिसांची तत्पर कारवाई
पंचवटीत तरुणावर हल्ला; पोलिस तपास सुरू
लाल दिवा-नाशिक,दि.२१: -विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया नाशिकमध्ये बहुतांश शांततेत पार पडली. तुरळक घटना वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, पंचवटीत घडलेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. यामुळे निवडणूक सुरक्षेबाबत पोलिसांची सतर्कता दिसून आली.
१९ नोव्हेंबर रोजी रात्री पंचवटीत एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. निवडणुकीच्या पैशाच्या वाटपाचा संशय घेत ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पीडिताची मदत केली. तसेच, या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नेमली आहेत.
या घटनेव्यतिरिक्त निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. नागरिकांच्या सहकार्यामुळे निवडणूक यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे