दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या… मुख्य आरोपीस नाशिक पोलिसांनी घेतले ताब्यात…… नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार …… .शांतता राखण्याचे पोलीस आयुक्तालय कडून आवाहन…!
दिवा : नाशिक पोलीस आयुक्तालया तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आज दि.२२/०६/२०२४ रोजी पंचवटी पोलीस ठाणे हददीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल या अनुषंगाने छापीव पत्रके टाकण्यात आले होते. सदर पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो व नाव नमुद होते. परंतु पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटो मधील व्यक्तीचा काही संबध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर प्रकरणातील मुख्य आरोपी याने तयार केलेल्या पत्रकामधुन दोन समाजा मध्ये जातीय तेढ निर्माण करणे हा उददेश नसुन पत्रकामध्ये नमुद असलेला व्यक्ती व मुख्य आरोपी यांच्या मध्ये वैयक्तीक वाद असुन सदर पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटो मधील इसमाला त्रास व्हावा या उददेशाने पत्रके तयार करून टाकण्यात आली होती.
सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी विरूध्द सबळ पुरावे मिळुन आले असुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.
तरी नाशिक पोलीस आयुक्तालया तर्फे सर्व नाशिककरांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे
(प्रशांत बच्छाव ) पोलीस उप आयुक्त, गुन्हे नाशिक शहर