जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे २ मे रोजी आयोजन : तहसीलदार परमेश्वर कासुळे
लाल दिवा, ता. ३० : महाराष्ट्र दिना निमित्त आज 1 मे रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन उद्या मंगळवार, 2 मे 2023 रोजी होणार आहे, अशी माहिती महसूल विभागाचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन मंगळवार, 2 मे रोजी दुपारी 2.00 वाजता मध्यवर्ती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे केले आहे. या लोकशाही दिनातील अर्ज विहित नमुन्यात असावे. त्यातील तक्रार अथवा निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक आहे. तसेच चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने दोन प्रतीत 15 दिवस आधी अर्ज पाठविण्यात यावा. त्याचप्रमाणे तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्यानी जिल्हा लोकशाही दिनात अर्ज सादर करावा.
न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व अपिल्स, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत, असेही तहसीलदार श्री. कासुळे यांनी कळविले आहे.