संवाद जिव्हाळ्याच्या माध्यमातून तहसीलदार डॉ. राजश्री (ताई) अहिरराव यांनी साधला संवाद व सोडविल्या समस्या ……. नागरिकांनी मानले जाहीर आभार…..!
लाल दिवा, ता. २५ : नाशिक तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव हे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संवाद साधत आहे त्यांचे सदर नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अशाच प्रकारचा त्यांनी संवाद साधला असून त्याचे विवेचन त्यांनी पुढील प्रमाणे केले आहे.
आपणांसर्वांच्या हक्काच्या असं व्यासपीठ, संवाद जिव्हाळ्याचा..! आज याच सदराचा ३० वा भाग माझ्यासाठी खरंच खास आहे. कारण यात आपणांसर्वांचा विश्वास सामावलाय. माझ्या सेवेच्या या प्रवासाला आपण दिलेला प्रतिसाद, आपल्या विविध प्रतिक्रिया, सूचनांतून वेळोवेळी व्यक्त होत माझा उत्साह वाढवितो.
मागील संपूर्ण आठवडा हा लग्नसराई निमित्त भेटीगाठीत गेला. अगदी आवर्जून दिलेलं निमंत्रण आणि येण्याचा प्रेमळ आग्रह यामुळे कार्यालयीन कामकाज सांभाळत उर्वरीत वेळ जीवाभावाच्या माणसांना भेटण्यासह त्यांच्याशी जिव्हाळ्याचा संवाद साधण्यात छान जायचा. कधी कौटुंबीक गप्पा, कधी प्रश्नांचे निराकरण या सर्वांत मला त्यांचा माझ्यावरील एक विश्वास जाणवला. डॉक्टर ताई, माझी ही अडचण आहे, काय करू ? डॉक्टर ताई, आमच्या गावचा हा प्रश्न तसाच आहे, काय करावं लागेल सांगा ना ? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत गेले, मी शक्य त्यांचं निराकरण करत त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य कसं येईल हे पाहत गेले.
जेव्हा परिसरातील अनेकांशी भेटण्याचा योग येतो तेव्हा जाणवतं की आपल्या ग्रामीण भागात आजही अनेक प्रलंबीत प्रश्न, समस्या आहेत. आज एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि या आधी ग्रामीण भागातच वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलेल्याचा अनुभव म्हणून आपणांस वचन देते की आपल्या समस्यांच्या निराकरणाचा प्रामाणिक प्रयत्न येत्या काळात मी करेन. आपण आपल्या समस्या मला प्रत्यक्ष भेटून वा फोन, मेसेजेसद्वारे कळवा, सर्वांचं योग्य ते समाधान निघेल ही खात्री बाळगा.
भेटू पुढील गुरूवारी, नव्या विषयासह, तोपर्यंत संपर्कात रहा, भेटत रहा !
डॉ. राजश्री हरिश्चंद्र अहिरराव,
+91 9503217555
F drrajashriahirrao
डॉ. राजश्री हरिश्चंद्र अहिरराव rajashrigangurde@gmail.com