दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने बेकायदेशीररित्या गावठी कट्टा, जिवंत काडतूस, तलवार व कोयता बाळगणा-या इसमास केले हत्यारासह जेरबंद..!

लाल दिवा, ता. २४ : अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयात नाशिक शहर हद्दीत अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणारे इसम / गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याकरीता दरोडा व शस्त्र विरोधी पथक तयार / निर्माण करून कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मा. श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री वसंत मोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळणा-या गुन्हेगारांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

दरोडा व शस्त्र विरोधी पथकातील पोलीस अंमलदारांना दि. २४/०५/२०२३ रोजी गुप्त बातमी मिळाली की अंबड पोलीस स्टेशन हद्दीत हद्दपार इसम नामे अक्षय गणपत गावंजे हा हातात तलवार व कोयता घेवुन सावता नगर परिसरात दहशत माजवित आहे. सदरच्या माहीतीवरून दरोडा व शस्त्र विरोधी पथक नाशिक शहर यांनी आरोपी हद्दपार इसम नामे अक्षय गणपत गावंजे वय २४ वर्षे, राहणार- एन-४२, जेई १/४/६, सावता नगर, सिडको, नाशिक यास सापळा रचुन ताब्यात घेतले. त्याचेजवळ ०१ गावठी देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनह, ०३ जिवंत काडतूस, ०१ धारदार तलवार व ०१ कोयता जवळ बाळगतांना मिळुन आल्याने व त्याने मा. पोलीस आयुक्त कार्यालयाकडील शस्त्र बंदी मनाई आदेश व हद्दपार आदेशाचे भंग केल्याने त्यांचे विरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम कलम ३/२५,४/२५,५/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

सदरची कामगिरी मा. श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नाशिक शहर, मा. श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधीपथक मधील सपोनि किरण रोंदळे व पोलीस अंमलदार १ ) पोहवा विजयकुमार सुर्यवंशी २) पोअं महेश खंडबहाले ३) पोअं संदीप डावरे ४) पोना मोहन देशमुख ५ ) मपोअं मनिषा सौरभ कांबळे व मुंबईनाका पोलीस ठाणेकडील ६) पोहवा रोहिदास सोनार ७) पोशि समीर बालम शेख यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!