नामदार छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ सुनील पैठणकर मैदानात….!

लाल दिवा-नाशिक,२४ : सध्याचं मराठा समाजातील सरकारी नोकऱ्यांतील व शैक्षणिक संस्थेत व ॲडमिशन मधिल प्रतिनिधित्वाच्या डेटानुसार मराठा प्रतिनिधित्व ॲडईक्वेट म्हणजे पुरेसे आहे. असे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे. म्हणून आरक्षण या संविधानिक तरतुदीत राज्य घटनेच्या कलम 16(4) नुसारuvp मराठा समाज पात्र होत नाही. अशी सुस्पष्ट सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर असुनही जरांगेसारख्या काही लोकांनी जो अट्टाहास व हेकेखोर पणा चालवला आहे. त्यातून फक्त मराठा समाजाचीच दिशाभूल होत आहे. या गोंधळात गोरगरीब मराठा मुलं भावनेच्या भरात आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. आरक्षणाचा पोपट मेला आहे. या कटुसत्यपासून मराठा समाजाला अंधारात ठेवून काही समाजघटक आपला राजकिय अजेंडा रेटून नेत आहेत. दुर्दैवाने सर्वसामान्य गोरगरीब मराठा तरूण यात भरडला जात आहे. याची सर्व जबाबदारी हेकेखोर नेते, साहित्यिक पत्रकार वगैरे लोकांचीच आहे. मराठा समाजाचे प्रचंड अवमूल्यन या लोकांनी चालवलं आहे. हे आधी लक्षात घ्या. म्हणजे अशा लोकांपासून सामान्या मराठा समाजाला वाचवता येईल. : सुनील पैठणकर

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
1
+1
4
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!