नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी चे राजु सुर्वे यांची दमदार कामगिरी………..सोन्याची पोत ओरबडणारे गुन्हेगार २४ तासात ग्रामीण पोलीसांचे जाळयात….!
लाल दिवा-नाशिक,ता .१२ :- गिरणारे रोड, गोवर्धन शिवारात महिलेची सोन्याची पोत ओरबडणारे गुन्हेगार २४ तासात ग्रामीण पोलीसांचे जाळयात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारचे सुमारास नाशिक ते गिरणारे रोडवर गोवर्धन शिवारात हॉटेल गंमत जंमत परिसरात फिर्यादी नामे छबुबाई वाघ, वय ५५ वर्षे या त्यांचे चहाचे टपरीवर त्यांचे मुलाशी फोनवर बोलत असतांना मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात दोन इसमांनी त्यांचे गळयातील सोन्याची पोत ३५,०००/- रूपये किंमतीची बळजबरीने हिसकावून जबरी चोरी करून मोटर सायकलवर पळून गेले म्हणून नाशिक तालुका पोलीस ठाणेस गुरनं ३४/२०२४ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर व श्री. अनिकेत भारती यांनी नाशिक तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सत्यजित आमले यांनी घटनास्थळावर पोलीस पथकांना पाचारण केले. त्याप्रमाणे पोलीस पथकांनी घटनास्थळ परिसरात रोडवरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरांची पडताळणी करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे विचारपुस केली. त्याआधारे आरोपीतांचे मिळालेले वर्णन व गुन्हयात वापरलेली मोटर सायकलचा शोध घेतला असता, यातील आरोपी हे नाशिक शहारातील असल्याचे समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने समांतर तपास करून ध्रुवनगर परिसरातून संशयीत नामे १) सागर दिनकर देवरे, वय २४, रा. शिल्पा आनंद सोसायटी, शिवाजीनगर, नाशिक, २) चंदर सिताराम फसाळे, वय २७, रा. लाडची, धोंडेगाव, ता. जि. नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे वरील गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी दोघांनी नाशिक ते गिरणारे रोडवर हॉटेल गंमत जंमत येथील एका चहाचे टपरीवरील महिलेची पोत जबरीने हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेले आरोपी सागर देवरे व चंदर फसाळे यांचे कब्जातुन वरील गुन्हयात चोरून नेलेली सोन्याची पोत व गुन्हयात वापरलेली होन्डा शाईन मोटर सायकल असा एकुण ७०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी नाशिक तालुका पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर व श्री. अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे, नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सत्यजित आमले, सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, स्थागुशाचे पोउनि दत्ता कांभिरे, पोहवा गोरक्षनाथ संवस्तरकर, किशोर खराटे, प्रविण सानप, पोकॉ विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नाशिक तालुका पो.स्टे. चे पोहवा नंदु वाघ, शितल गायकवाड, सायबर पो.स्टे. पोना परिक्षीत निकम, प्रमोद जाधव यांनी वरील गुन्हा २४ तासात उघडकीस आणून कामगिरी केली आहे.