नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीमध्ये……. राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ ….!
लाल दिवा : खेळाडूंना खेळातून आपले कौशल्य, नैपुण्य
दाखविण्याची संधी असते. शिवाय, आपली शारीरिक तंदुरुस्तीही सिद्ध होत असते. खेळातून खेळाडूवृत्तीही विकसित होत असते. त्यादृष्टीने राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये पोलिस खेळाडूंनी खेळावे. नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना आज पासून (रविवार) प्रारंभ होत आहे, असे नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस आयुक्तालयातर्फे राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. नाशिकमध्ये राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांना आज पासून (ता. ४) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३ हजार ५०० महिला-पुरुष पोलिस खेळाडू सहभागी झाले आहेत.
दरम्यान, स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन ८ तारखेला महाराष्ट्र पोलिस दलाच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते होणार आहे. समारोप १० फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
https://x.com/nashikpolice/status/1754137565257437229?s=20
-उल्लेखनीय…
– राज्यभरातून येणार ३५०० पोलिस खेळाडू
-महिला खेळाडू ९६०, पुरुष खेळाडू २५४०
-महाराष्ट्र पोलिस अकादमीतील १९ मैदानांवर स्पर्धा
-नाशिकरोड जलतरण तलाव येथे स्विमिंगच्या स्पर्धा
-स्पर्धेत पुरुष सांघिक ७, महिला सांघिक ४ संघ
-१० फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा पारितोषिक वितरणाने समारोप
-सांघिक संघ
-हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबडडी, खो-खो, हॅण्डबॉल
-वैयक्तिक स्पर्धा
– अॅथेलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, ज्युडो, वेटलिफ्टिींग, पॉवरलिफ्टिींग, तायक्वांदो, बॉडीबिल्डींग
-वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पर्धा
-५ कि.मी चालणे, नेमबाजी (पिस्तुल)