आर्थिक लाभासाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर आणि लिपिकावर कारवाई करावी : युवा स्वाभिमान पार्टीने केली मागणी…..!
लाल दिवा : आर्थिक लाभासाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर आणि लिपिकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नाशिक येथील डॉ.प्रविण बोरा आणि रेकॉर्ड रूमचे लिपिक अतिश भोईर यांनी सुप्रिया संदेश एकमोडे यांच्याकडून आर्थिक लाभापोटी ४ ऑगस्ट २०२२ रोजी एम.एल.सी २८८० नंबरचे बनावट प्रमाणपत्र दिलेले आहे.सदरील प्रमाणपत्र हे बनावट असुन डॉक्टर आणि लिपिक यांनी सदरील महिलेकडून पैसे घेवुन हे प्रमाणपत्र दिले आहे.या बनावट प्रमाणपत्रामुळे जे गुन्हे दाखल झाले त्याला जबाबदार कोण ? शिवाय या कृत्यामुळे जिल्हा रुग्णलयाचे नाव देखील बदनाम झाले असून बनावट प्रमाणपत्राची प्रत मुख्यमंत्र्यांना देखील पाठविण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या प्रकरणी संबधित डॉक्टर आणि लिपिक यांच्यावर शिस्तभंग आणि निलंबनाची कायदेशीर कारवाई करावी अन्यथा बांगड्या भरो आंदोलन करण्यात येईल अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाप्रमुख संतोष शर्मा यांच्यासह युवा जिल्हाप्रमुख विनायक ढाकणे, महिला जिल्हाप्रमुख राजलक्ष्मी पिल्ले, शहराध्यक्ष नितीन गुणवंते, युवा शहराध्यक्ष वृषभ शर्मा,जिल्हा सरचिटणीस रज्जाक शेख, जिल्हासचिव निलेश संके, तालुकाप्रमुख इस्माईल सय्यद, रोहित मते, निसार पठाण, प्रविण सोनवणे, चंचल पवार, अमोल देसले व आदी कार्यकर्ते यांनी जिल्हा शलयचिकित्सकांकडे केली आहे.